इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला २७७ धावांचे आव्हान देण्यात आले आहे. या सामन्यात मोहम्मद शामीने भेदक मारा करत पाच विकेट घेतल्या आहे. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर याने अर्धशतकी खेळी केली. त्याशिवाय जोश इंग्लिश, स्टिव्ह स्मिथ आणि लाबुशेन यांनी महत्वाचे योगदान दिले. त्याशिवाय कर्णधार पॅट कमिन्स याने अखेरीस जबराट फिनिशिंग टच दिला. ऑस्ट्रेलियाने ५० षटकात २७६ धावांपर्यंत मजल मारली.
या सामन्यात शामीने दहा षटकात ५१ धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या. या सीरिजला आजपासून सुरुवात झाली आहे. या सीरिजमध्ये तीन सामने होणार असून दुसरा सामना हा २४ सप्टेंबरला व तिसरा सामना २७ सप्टेंबरला होणार आहे. पहिल्या दोन सामन्याचा संघ व तिस-या सामन्याचा संघ अगोदरच जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या दोन सामन्यासाठी कॅप्टन आणि विकेटकीपर केएल राहुल आहे. तर उपकर्णदार रवींद्र जडेजा आहे. तिस-या सामन्यासाठी कॅप्टन रोहित शर्मा तर उपकर्णदार हार्दिक पंड्या असणार आहे.
पहिल्या दोन सामन्यासाठी टीम इंडिया केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा हे संघात आहे.
India squad announced for series against Australia