शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भाषेचा सन्मान केलात तरच प्रतिष्ठा: प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि लेखक आशुतोष राणा यांची ही मुलाखत चर्चत

by Gautam Sancheti
सप्टेंबर 16, 2023 | 1:33 pm
in संमिश्र वार्ता
0
Rana430NA

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तिसऱ्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेच्या दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ कवी, गीतकार आणि टीव्ही पत्रकार आलोक श्रीवास्तव यांनी त्यांची मुलाखत घेतली. आशुतोष राणा सुरुवातीला म्हणाले की, हिंदी ही माझ्या स्वप्नांची भाषा आहे, माझ्या प्रियजनांची भाषा आहे, माझ्या रोजगाराची भाषा आहे, त्यामुळे ती समृद्ध झालीच पाहिजे. हा आपल्या व्यवसायाचा आणि वर्तनस्वभावाचाही विषय आहे. माझ्या आईला अनेक भाषा अवगत होत्या. आम्ही लहान असताना ती म्हणत असे की तुम्ही भाषेचा सन्मान राखलात तर ती तुमचा मान राखेल. मी एक अभिनेता म्हणून तुम्हाला आवडेन किंवा आवडणार नाही, पण एक भाषाप्रेमी असल्याने तुम्हाला मी नक्कीच आवडेल. भाषा आपल्यातील भावना जागृत करते. लिहिण्या बोलण्यात वापर करून हिंदी भाषेचा आम्ही सन्मान केला असे अनेकजण म्हणतात, पण मी म्हणेन हिंदीने मला सन्मान दिला आहे. आशुतोष राणाची ओळख तुमच्यामध्ये अभिनेता म्हणून असेल पण मला वाटते की माझी ओळख एक लेखक आहे.

हिंदी पंधरवडा साजरा करणे ही आपली उत्सवधर्मिता
लोक मला विचारतात की हिंदी पंधरवडा का साजरा केला जातो, फक्त 15 दिवसच हिंदीची सेवा का? तेव्हा त्यांना माझे सरळ उत्तर आहे की हा विनोदाचा विषय नाही. ही आपली उत्सव साजरा करण्याची भावना आहे. आपण वर्षातून एकदा आपला वाढदिवस साजरा करतो याचा अर्थ आपण 364 दिवस मृतप्राय आहोत असा होत नाही. हिंदी दिवस आणि हिंदी पंधरवडा साजरा करण्यामागील कारण म्हणजे या दिवशी आणि या पंधरवड्यात आपण हिंदीच्या सेवेचा उत्सव साजरा करतो. आपल्या देशात केवळ सणच साजरे होत नाहीत, भावनाही साजऱ्या होतात, भाषाही साजऱ्या होतात. भारतीयांच्या स्वभावाचा मूळ कल उत्सवाकडे आहे, असे सांगत आशुतोष राणा यांनी अनेक रंजक प्रसंग कथन केले आणि कविताही सादर केल्या.

तरुणाईचा संबंध वयाशी नसून अवस्थेशी
तारुण्याचा संबंध वयाशी नसून अवस्थेशी आहे, असे आशुतोष राणा म्हणाले. जोपर्यंत तुमच्या वडिलांच्या पायात स्वत:च्या हाताने जोडे घालण्याची क्षमता आहे किंवा जोपर्यंत तुम्ही तुमच्या आईचा किंवा मुलीचा हात धरून चालू शकता तोपर्यंत तुम्ही तरुण आहात. त्यामुळे तरुणाईचा संबंध वयाशी नसून अवस्थेशी आहे, असे माझे मत आहे.

तिसऱ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात महाराष्ट्र हिंदी परिषदेच्या उपाध्यक्षा प्रियांका शक्ती ठाकूर यांनी ‘सर्व सुलभ, सर्वसमावेशक आणि सर्वव्यापी भाषा-हिंदी’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. हिंदी खूप महत्त्वाची आहे, त्यात भरपूर गोडवा आहे, पण वेळोवेळी तिचा गोडवा कमी होत असतो. याला आपणच कारणीभूत आहोत, असे त्या म्हणाल्या. मोठ्या कार्यक्रमात गेल्यावर आपल्याला वाटते की इथे हिंदी बोललो तर आपले महत्त्व कमी होईल, पण हे बरोबर नाही. तिथे आपण इंग्रजीत बोलतो. आपल्या स्टॅंडर्डचा आपण विचार करतो, हे चुकीचे आहे असे मला वाटते. त्यासाठी आपली विचारसरणी बदलायला हवी. आपण कोणत्याही सभेला, कार्यक्रमाला किंवा परिषदेला कुठेही गेलो तरी हिंदीतूनच बोलायचे, असे ठरवले, तर हिंदी सर्वव्यापी व्हायला वेळ लागणार नाही आणि हिंदीचे स्वरूपच बदलून जाईल. आपल्या गृहमंत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी एक अध्यादेश जारी केला होता, त्यानुसार डॉक्टरांनी आपले प्रिस्क्रिप्शन हिंदीत द्यायचे आहेत. यामुळे अधिकाधिक लोकांना योग्य माहिती मिळेल आणि आम्ही सर्वांसाठी हिंदी सुलभ करू शकू.

हिंदीत राजभाषा होण्यासाठी सर्व गुण
आपल्या राज्यघटनेने 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला राजभाषेचा दर्जा दिला. आपल्याला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही, त्याचप्रमाणे हिंदीलाही राजभाषेचा दर्जा सहजासहजी मिळाला नाही. इंग्रजीसह आणि तमिळ, तेलगू, कन्नड, पंजाबी, बंगाली यांसारख्या इतर भारतीय भाषांचे हिंदीला आव्हान होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही राजभाषा होती, मुघलांच्या काळातही फारसीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला होता. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि राज्यघटना लागू झाल्यानंतर राजभाषेसाठी त्रिभाषा सूत्र स्वीकारण्यात आले. ज्यामध्ये हिंदी, इंग्रजी आणि कोणत्याही राज्यातील प्रादेशिक भाषेत काम करण्याची परवानगी मान्य करण्यात आली. इंग्रजीच्या अवघडपणामुळे आणि वैज्ञानिकतेमुळे, 19व्या आणि 20व्या शतकातही सर्वसामान्य लोकांमध्ये त्याची भीती होती. त्यामुळे ही भाषा गरीब आणि ग्रामीण लोकांसाठी अप्राप्यच राहिली. यासोबतच केवळ एका विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित असणे ही प्रादेशिक भाषेची कमतरता राहिली. परिणामी हिंदीत राजभाषेचा दर्जा मिळवून देणारे सर्व गुण आहेत.

महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळकांनीही हिंदीचा अवलंब केला
आपल्या हिंदी भाषेचे तीन गुण आहेत. प्रथम, हिंदी भाषा सर्व सुलभ आहे, हिंदी भाषा सर्वसमावेशक आहे आणि हिंदी भाषा सार्वत्रिक आहे. हिंदी सर्वसामान्यांना सहज उपलब्ध आहे. त्यामुळे महात्मा गांधी गुजराती आणि लोकमान्य टिळक मराठी असूनही त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत जनजागृतीसाठी हिंदी भाषेचा वापर केला. कारण त्यांना माहीत होते की, हिंदी भाषा सर्वांना उपलब्ध आहे आणि तिचा सर्वसामान्यांवर अधिक प्रभाव पडेल, असे मत प्रियांका शक्ती ठाकूर यांनी मांडले.
This interview with famous film actor and writer Ashutosh Rana
……………………….

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारताची मसाला निर्यात सध्या ४ अब्ज डॉलर्स; २०३० पर्यंत इतक्या अब्ज डॉलर्सवर पोहचणार

Next Post

मराठवाड्याला मोठे गिफ्ट; मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे निर्णय (बघा व्हिडिओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींसाठी लाभदायक दिवस, अर्थप्राप्ती होईल, जाणून घ्या, शुक्रवार, १२ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 11, 2025
Governance 1 1920x1248 1
संमिश्र वार्ता

‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे…हे पोर्टल होणार कार्यान्वित

सप्टेंबर 11, 2025
IMG 20250911 WA0337 1
स्थानिक बातम्या

हाय्रॉक्स मुंबई आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या स्ट्राईकिंग स्ट्रायडर्सचा चमकदार विजय

सप्टेंबर 11, 2025
image005V4IZ
संमिश्र वार्ता

सेनादलांतील या दहा महिला अधिकारी नऊ महिन्यांत २६ हजार सागरी मैलांचा प्रवास पूर्ण करणार…

सप्टेंबर 11, 2025
HYRYDER LE car 1 1
संमिश्र वार्ता

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून नवरात्री निमित्त ही ऑफर…१ लाख रूपयांहून अधिक फायदा

सप्टेंबर 11, 2025
ASHTAVINAYAK 2 1024x682 1
राज्य

अष्टविनायक विकास आराखडा….उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

सप्टेंबर 11, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात चार घरफोड्या…तीन लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

सप्टेंबर 11, 2025
Untitled 11
संमिश्र वार्ता

धक्कादायक….महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी रेती माफियांकडून ड्रोनचा वापर

सप्टेंबर 11, 2025
Next Post
images 42

मराठवाड्याला मोठे गिफ्ट; मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे निर्णय (बघा व्हिडिओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011