इंडिया दर्पण डेस्क
भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान रोहित शर्माने दहा हजार धावांचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर त्याने सर्वात वेगाने १० हजार धावा करण्याचा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले. श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत २३ धावा करताच रोहितच्या वनडे क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण झाल्या.
सोमवारी भारत पाकिस्तान सामन्यात विराट कोहलीने १३ हजार धाव करुन विक्रम केला. त्यानंतर आज रोहित शर्माने १० हजाराचा टप्पा पार केला. विशेष म्हणजे रोहितने २४१ डावात हा टप्पा पार केला. सचिनला यासाठी २५९ डाव लागले होते. याबाबत भारताचा विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराटने फक्त २०५ डावात १० हजार धावा केल्या होत्या.
रोहित शर्माने २ षटकारांसह आशिया कपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला. त्याच्या नावावर आशिया कपमध्ये २८ षटकार झाले आहेत. हा विक्रम आधी पाकिस्तानच्या शाहिद आफ्रीदीच्या नावावर होता.
वनडेत १० हजार धावा करणारे भारतीय फलंदाज
सचिन तेंडुलकर- १८ हजार ४२६ धावा
विराट कोहली- १३ हजार २४ धावा
सौरव गांगुली- ११ हजार ३६३ धावा
राहुल द्रविड- १० हजार ८८ धावा
महेंद्र सिंग धोनी- १० हजार ७७३ धावा
रोहित शर्मा- १० हजार
Indian cricket team captain Rohit Sharma made this record today
India Darpan Desk
https://x.com/BCCI/status/1701536628987277759?s=20
https://x.com/BCCI/status/1701536628987277759?s=20