इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्याची वनडे मालिका मधील दुसरा सामना आज इंदौर येथील होळकर स्टेडिअमवर रंगणार आहे.
हा सामना जिंकून मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाने व्यूहरचना आखली आहे. तर दुसरीकडे कांगरु पहिल्या सामन्यातील पराभवाचे उ्ट्टे काढण्याचा प्रयत्न करणार आहे. हा सामना दुपारी १.३० सुरु होणार आहे. विश्वचषकापूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया ही मालिका दोन्ही संघासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे आजचा सामना रंगणार आहे. या सामन्यावर पावसाचेही सावट आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी इंदौरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला.
२२ सप्टेंबर रोजी झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने पाच गडी गमावत दणणीत विजय मिळवला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया २७७ धावांचे आव्हान दिले होते, हे आव्हान भारताने ४८.४ षटकात पार केले. या सामन्यात २७७ धावांचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात केली. शुभमन गिलने ६३ बॉलमध्ये ७४ धावा केल्या. तर ऋतुराज गायकवाड ७१ धावा केल्या. के.एल. राहुल ५८, सर्यंकुमार यादव याने ५०, श्रेयस अय्यर ३, इशान किशन १८ धावा केल्या. रविंद्र जडेजा ३ धावा केल्या.
या सामन्यात मोहम्मद शामीने भेदक मारा करत पाच विकेट घेतल्या आहे. जसप्रीत बुमराह, आर अश्विन,,रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर याने अर्धशतकी खेळी केली. त्याशिवाय जोश इंग्लिश, स्टिव्ह स्मिथ आणि लाबुशेन यांनी महत्वाचे योगदान दिले. त्याशिवाय कर्णधार पॅट कमिन्स याने अखेरीस जबराट फिनिशिंग टच दिला. ऑस्ट्रेलियाने ५० षटकात २७६ धावांपर्यंत मजल मारली.
या सीरिजमध्ये तीन सामने होणार असून आज दुसरा सामना आहे तर तिसरा सामना २७ सप्टेंबरला होणार आहे. पहिल्या दोन सामन्याचा संघ व तिस-या सामन्याचा संघ अगोदरच जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या दोन सामन्यासाठी कॅप्टन आणि विकेटकीपर केएल राहुल आहे. तर उपकर्णदार रवींद्र जडेजा आहे. तिस-या सामन्यासाठी कॅप्टन रोहित शर्मा तर उपकर्णदार हार्दिक पंड्या असणार आहे.
पहिल्या दोन सामन्यासाठी टीम इंडिया केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा हे संघात आहे.
The second match between India and Australia will be played today