मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंडिया आघाडीच्या बैठकीत १३ जणांची समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील शरद पवार व संजय राऊत यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल, डीएमकेचे एम के स्टेलिन, आरजेडीचे तेजस्वी यादव, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी, आपचे राघव चढ्ढा, जावेद अली खान, ललन सिंह, डी राजा आणि ओमर अब्दुला, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांचा या समन्वय समितीत समावेश असणार आहे.
मुंबईतील पंचतारांकित ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीच्या परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. सर्व घटकपक्षांची बैठक सध्या सुरू आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीत ठराव देखील मंजूर करण्यात आले आहे. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झालीय. या मुद्द्यांबाबत इंडिया आघाडीचे नेते पत्रकार परिषदेत माहिती देणार आहेत. पण त्याआधी त्यांनी तीन ठराव केल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकीत जे ठराव झाले त्यात येणारी लोकसभा निवडणूक आम्ही एकत्रित लढवणार आहोत. आम्ही प्रत्येक राज्यात जागा वाटप करू आणि त्यावर तोडगा काढू.
,लवकरात लवकर देशभरात लोकांच्या प्रश्नांवर सभा, संमेलने घेऊ, जुडेगा भारत, जितेगा इंडिया या स्लोगनसह वेगवेगळ्या भाषेत आम्ही प्रचार करणार आहोत असे ठराव आहेत.
Formation of a 13-member coordination committee at the meeting of the India Alliance, including these leaders