मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईतील पंचतारांकित ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीच्या परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. सर्व घटकपक्षांची बैठक झाल्यानंतर आता पत्रकार परिषद सुरु आहे. इंडिया आघाडीच्या या बैठकीत समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून ठराव देखील मंजूर करण्यात आले आहे. ही बैठक लाईव्ह बघा
या बैठकीच्या आयोजन महाविकास आघाडीकडून करण्यात आले होते. या बैठकीनंतर इंडिया आघाडीची बैठक पत्रकार परिषद पार पडली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. यावेळी त्यांनी बैठकांमध्ये काय-काय निर्णय घेतले याबद्दल थोडक्यात माहिती दिली. ते म्हणाले की, काल रात्र आणि आज दुपारी तीन वाजेपर्यंत अनेक विषयांवर चर्चा झाली. काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे इंडिया आघाडीची १४ सदस्यीय समन्वय समिती स्थापन करण्यात आलं आहे. त्यानंतर कॅम्पेन कमिटी, वर्किंग ग्रुप ऑफ सोशल मीडिया, वर्किंग ग्रुप ऑफ मीडिया आणि वर्किंग ग्रुप ऑफ रिसर्च या चार समितींची देखील स्थापना करण्यात आली आहे. सर्व पक्षांचे नेत्यांचा या कमिटींमध्ये समावेश करण्यात आला आहे.
India aghadi press