इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : काही दिवसांपूर्वीच करदात्यांनी आयटीआर भरून दिला. मात्र, बँकेशी संबंधित पुरेशी माहिती नसल्याने तब्बल ३५ लाख आयटीआर रखडल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये यंदा ९ ऑक्टोबरपर्यंत १.५० लाख कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी सांगितले, अनेकांनी त्यांच्या आयटीआरमध्ये त्यांची जुनी बँक खाती दिलेली आहेत. तर अनेकांची बँक खाती अजूनही पडताळलेली नाहीत. परंतु, शाखा स्थलांतरित झाल्यामुळे शाखेचा आयएफएससी कोड बदलला आहे. बँकेशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत. ज्यामुळे आयटीआर रखडले आहेत. ज्यांना परतावा मिळत नाही त्यांनी त्यांचे बँक खाते एकदा तपासून पाहावे. ज्यांच्याकडे जुनी करदायित्व आहे, त्यांचेही परतावे अडकले आहेत. ५ हजार रुपयांपेक्षा जास्त देय असलेल्या करदात्यांना त्यांची जुनी खाती अद्ययावत करण्यास सांगितले जात आहे, जेणेकरून त्यांना त्यांचा परतावा मिळू शकेल. ते म्हणाले की, अशा रिफंडच्या सेटलमेंटला गती देण्यासाठी विभागाने मागणी व्यवस्थापन योजना सुरू केली आहे, ज्या अंतर्गत करदात्यांना प्रथम ईमेल पाठविला जातो आणि नंतर तीन दिवसांनी कॉल केला जातो.
७.५ कोटी आयटीआर दाखल
चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ७.२७ कोटी आयटीआर दाखल करण्यात आले आहेत, तर गेल्या आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या एप्रिल ते मार्च या कालावधीत ७.५ कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते. विभागाच्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात ९ ऑक्टोबरपर्यंत निव्वळ प्राप्तिकर संकलन (परताव्यानंतर) ९.५७ लाख कोटी रुपये होते, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत केलेल्या संकलनापेक्षा २१.८२ टक्के अधिक आहे. चालू आर्थिक वर्षासाठी प्रत्यक्ष कर संकलनाच्या उद्दिष्टापैकी ५२.५० टक्के आतापर्यंत जमा झाले आहे.
As many as 35 lakh income tax returns are stuck due to this reason… Is it yours too?