इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पूर्वी विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षकांकडून प्रचंड मार बसायचा, पण, त्याची तक्रार पालक करत नसते तर विद्यार्थी छडी लगे छम छम विद्या येई घम घम.. असं गुणगुणत ते सहन करत होते. पण, आत पालकच तक्रारी करायला लागल्यामुळे विद्यार्थ्यांना मारणे जवळपास बंद झाले आहे. आता शिक्षेची पध्दतही बदलली व शाळेतून छडी गायब झाली. असे असतांना हैद्राबादमध्ये एका खासगी शाळेतील शिक्षकाने गृहपाठ केला नाही म्हणून मारहाण केली म्हणून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हा विद्यार्थी ५ वर्षाचा असून त्याचे नाव हेमंत आहे. तो युकेजीमध्ये शिकत होता. आता इतक्या लहान मुलांचा गृहपाठ व त्याला मारहाण हे सर्व धक्कादायकच आहे…
रमांथपूर परिसरातील विवेक नगर येथील शाळेत शनिवारी शाळेत ही घटना घडली. या लहानशा मुलाला शिक्षकाने मारल्यानंतर तो जमीनीवर कोसळला. त्यानंतर त्याला शाळेतील कर्मचाऱ्याने रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
गृहपाठ न केल्यामुळे शिक्षकाने हा लहानग्या मुलाच्या डोक्यावर पाटी मारल्याचा आरोप पालकाने केला आहे.
ही घटना घडल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. मृत मुलाच्या पालकांनी आणि इतर पालकांनी या घटनेनंतर शाळेसमोर मृतदेहासह आंदोलन केले. य़ा आंदोलनात शिक्षकावर कडक कारवाईची मागणी केली. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून त्याचा तपास करुन कारवाई करणार आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये अशीच केजीच्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. यावेळेसही तक्रार करण्यात आली होती.
Five-year-old boy beaten by teacher for not doing homework, student dies