इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
उन्हाळ्यात रेल्वे, बस गाड्या, कार किंवा ट्रक सारख्या वाहनांना आग लागण्याच्या घटना नेहमीच घडतात. परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस असूनही गुजरातमध्ये रेल्वेगाडीला आग लागल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवदानी झाली नाही. गुजरातमधील तिरुचिरापल्ली ते श्री गंगानगर दरम्यान धावणाऱ्या हमसफर एक्स्प्रेसला शनिवार, २३ सप्टेंबर रोजी आग लागली. या आग लागल्याच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. रेल्वेच्या बोगीमधून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे दिसत आहे.
एकच गोंधळ उडाला
रेल्वेच्या बोगीला आग लागल्यानंतर लगेचच गोंधळ उडाला, मात्र या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. वलसाड जिल्ह्यात ही घटना घडल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वलसाडच्या नजिक छिपवाड येथे हमसफर एक्सप्रेसला जनरेटर असलेल्या डब्ब्याला आग लागल्याने घटनास्थळी प्रवाशांमध्ये मोठी पळापळ सुरू झाली. जनरेटरच्या डब्ब्याला आग लागल्यावर प्रवाशांनी भरलेल्या डब्ब्याकडे आग पसरू लागली. त्यामुळे तातडीने गाडी थांबवून जनरेटर असलेला डब्बा वेगळा करण्यात आला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दुसऱ्यांदा घडलेली घटना
पश्चिम रेल्वेच्या गुजरात मधील सुरत, अहमदाबाद, भडोच याप्रमाणेच वलसाड हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. मुंबई ते अहमदाबाद किंवा मुंबई ते उदयपूर, जयपूर या मार्गावर अनेक रेल्वे गाड्या दररोज धावत असतात. या रेल्वे मार्गावर प्रत्येक स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे रेल्वे कडून सुरक्षेसाठी सर्व प्रकारची काळजी घेण्यात येते, तरीही अचानकपणे काही वेळा दुर्घटना घडतेच, अशाच प्रकारची दुर्घटना वलसाडमधून जात असताना रेल्वेत घडली, तिरुचिरापल्ली जंक्शन ते श्री गंगानगर जंक्शनपर्यंत हमसफरच्या पॉवर कार(ब्रेक व्हॅन ) कोचमध्ये आग व धूर निघत होता. या अपघातात डब्यातील सर्व प्रवाशी सुखरुप आहेत. रेल्वे मध्ये आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी जेकोट रेल्वे स्थानकावर दाहोद आनंद मेमू ट्रेनमध्ये इंजिनला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. यावेळी आगीने रौद्र रुप धारण केल्याने ट्रेनमधील आगीच्या ज्वाळा पुढील डब्ब्यातही पसरल्या होत्या.
Huge fire in Humsafar Express… only escape of passengers…