नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एक सर्वसमावेशक सोल्यूशन प्रदाता असलेल्या एचटेकने आज भारतात ऑनर९० ५जी लाँच करण्याची घोषणा केली. ऑनर९० ५जी हा एआय व्लॉग मास्टर उपलब्ध असलेल्या २००एमपी मुख्य कॅमेरा आणि ३८४० एचझेड पीडब्ल्यूएम डीमिंग टेक्नॉलॉजीयुक्त इंडस्ट्रीतील आघाडीच्या क्वाड-कर्व्ड फ्लोटिंग डिस्प्लेने सुसज्ज आहे. नियमितपणे ऑनलाईन असणाऱ्या पिढीला वैयक्तिक अनुभव आणि मानव-केंद्रित सोल्यूशन्स माध्यमातून सशक्त करण्यासाठी ऑनर ९० ५जी अभूतपूर्व हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला एकाच डिव्हाईसमध्ये उत्तमपणे एकत्रित आणते.
लाँचबद्दल बोलताना एचटेक चे सीईओ माधव शेठ म्हणाले, एचटेकमध्ये आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि स्वावलंबी इकोसिस्टम असलेला मजबूत ब्रँड भारतीय ग्राहकांसमोर पुन्हा आणत एक महत्त्वाचा टप्पा पार करताना आनंद होत आहे. अग्रगण्य तंत्रज्ञानासह ग्राहकांना सक्षम बनविण्यावर लक्ष केंद्रित करत ऑनर सतत भक्कम संशोधन व विकास सेवांचे समर्थन असलेली डिस्प्ले टेक्नॉलॉजी, बॅटरी टेक सॉफ्टवेअर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये नावीन्यता आणण्यासाठी काम करत असते. ऑनरच्या मजबूत नेटवर्क आणि व्हॅल्यू चैनचा फायदा घेत आम्ही ऑनर९० ५जी च्या माध्यमातून भारतीय लोकांसाठी पहिला स्मार्टफोन लाँच करत आहोत.
ऑनर९० ५जी हा विक्रीसाठी एमराल्ड ग्रीन, डायमंड सिल्व्हर आणि मिडनाईट ब्लॅक या तीन रंगांमध्ये ऍमेझॉन आणि रिटेल चॅनेल्सवर १८ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजेपासून उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन ८ जीबी + २५६ जीबी आणि १२ जीबी + ५१२ जीबी या दोन स्टोरेज प्रकारांमध्ये येईल, ज्यांची किंमत अनुक्रमे रु. ३७,९९९ आणि रु. ३९,९९९ इतकी आहे.
नवीन लाँच केलेले ऑनर ९० ५जी खरेदी करणारे वापरकर्ते आयसीआयसीआय आणि एसबीआय बँक कार्ड्सवरून सीसी, डीसी, ईएमआयचा पर्याय वापरून ₹ ३,००० ची इंस्टंट सूट मिळवू शकतात. याव्यतिरिक्त, ऑनर ९० खरेदी करताना जे वापरकर्ते त्यांचे जुने स्मार्टफोन्स एक्चेंज करण्यास इच्छुक आहेत, ते ₹२,०००ची अतिरिक्त सवलत मिळू शकतात. याशिवाय, कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय रु. ५०००च्या ऑनर गुडीजच्या बंडल डीलसह सर्व आघाडीच्या बँका आणि बजाज फिनसर्व्ह कार्ड्सवर ९ महिन्यांपर्यंतचे नो-कॉस्ट-ईएमआय मिळवू शकतील. बंडल डीलचा भाग म्हणून वापरकर्त्यांना डिव्हाइसशी कम्पॅटीबल असणारा ३०डब्ल्यू टाईप-सी चार्जरही मोफत मिळेल.
ऑनर ९० त्याच्या ७.८ एमएम स्लिम थिन डिझाइन आणि १८३जी फेदरवेटद्वारे नाविण्यतेचा प्रसार करते. एक आनंददायक स्पर्श आणि मोहक दृश्य अनुभव प्रदान करणारा ऑनर ९० आकर्षकरित्या क्वाड-कर्व्ह बाजुंसह येतो. दीर्घकाळ टिकेल अशा पद्धतीने तयार केलेले ऑनर ९० डीपली रीइनफोर्स्ड ग्लाससह येतो, ज्यातून असाधारण मजबूती प्रदर्शित होते आणि कितीही वेळा खाली पडला तरी कर्व्ह डिस्प्लेचा बचाव होतो. ऑनर ९० त्याच्या मागील बाजूला आयकॉनिक एन सिरीजचे ड्युअल रिंग डिझाइन प्रदर्शित करते, ज्यात गोलाकार आराखडे आहेत, जे चमकदार दिसावेत म्हणून कटिंग टेक्निकने तयार केलेले आहे. यामुळे स्मार्टफोनच्या अभिजाततेच्या दर्ज्यात भर पडते. प्रत्येक कोनातून त्याचे वैशिष्ट्य दर्शवणारा हा डिव्हाइस मिडनाईट ब्लॅक, एमराल्ड ग्रीन आणि डायमंड सिल्व्हर अशा तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Today, HTech launched its first smartphone in India