नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वसामान्य व्यक्ती म्हणतो की नावात काय आहे, परंतु नावातच खूप काही आहे. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन असो की टाटा, बिर्ला, अंबानी ही नावे किंवा आडनावे घेतल्यावर विशिष्ट व्यक्ती डोळ्यासमोर उभे राहतात. मात्र प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाचा काहीजण गैरवापर करतात. त्यामुळे अभिनेत्यांनी या संदर्भात कोर्टात धाव घेतली आहे. अमिताभ बच्चन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आवाज, नाव आणि प्रतिमा यांना संरक्षण देण्याची त्यांनी मागणी केली आहे. अमिताभ बच्चन यांच्यातर्फे हरीश साळवे बाजू मांडणार आहेत. बिग बींच्या एकंदरीत व्यक्तीमत्त्वाचा विचार केल्यास त्यांनी कमावलेलं नाव, त्यांचा आवाज आणि समाजात असलेली त्यांची प्रतिमा या गोष्टी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्यामुळेच त्यांना संरक्षण देण्याची त्यांनी मागणी केली आहे.
त्याचप्रमाणे आणखी अभिनेता एक सध्या चर्चेत आहेत. तो अभिनेता म्हणजेच सर्वांचा लाडका एव्हर ग्रीन अनिल कपूर होय.
उच्च न्यायालयात याचिका दाखल
आपल्या नावाचा गैरवापर होत असल्याने अनिल कपूर कोर्टात धाव घेतली आहे. आता दिल्ली उच्च न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी होणार आहे. वैयक्तिक सुरक्षिततेसाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. अनिल कपूर यांनी दाखल केलेल्या याचिकेत विविध संस्थांना त्यांच्या संमतीशिवाय त्यांचे नाव अे के (AK ), आवाज, फोटो आणि आडनाव इत्यादी वापरण्यावर पेटंट असणार आहे. न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंह यांच्या खंडपीठासमोर लवकरच या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
अनिल कपूरने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत सोशल मीडिया साईट्स, अनेक मोठ-मोठे चॅनेल हे अनिल कपूर यांच्या नावाचा, आवाजाचा, स्वाक्षरी, प्रतिमाचा परवानगी न घेता वापर करतात. त्यामुळे या वैयक्तिक हक्कांचे उल्लंघन करण्यावर कायमस्वरूपी अभिनेत्याने मनाई हुकूम मागितला आहे. आता अनिल कपूरची चाहते याबाबत काय प्रतिक्रिया देतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लवकरच या प्रकरणाची सुनावणी होणार
अनिल कपूर यांच्याआधी अमिताभ बच्चन यांनीदेखील खासगी अधिकाराच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अनिल कपूरच्या संमतीशिवाय कोणत्याही व्यावसायिक किंवा वैयक्तिक फायद्यासाठी अभिनेत्याच्या फायद्याचा गैरवापर करणं अयोग्य आहे. अभिनेत्याच्या AK, लखन, मि.इंडिया, नायक आणि झकास यासारख्या गोष्टींचा वापर करण्यासाठी त्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. आवाज, नाव आणि प्रतिमा यांना संरक्षण देण्याची अनिल कपूर यांनी मागणी केली आहे. खासगी अधिकाराच्या संरक्षणासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंह यांच्या खंडपीठासमोर लवकरच या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. अनिल कपूर लवकरच भूमी पेडणेकर हे दोघे शहनाज गिल यांच्या आगामी सिनेमात झळकणार आहे. ‘थँक्यू फॉर कमिंग’ असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमाची निर्मिती अनिल कपूर यांच्या मुलीने रिया कपूरने केली आहे. दरम्यान याचिका प्रकरणी काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Amitabh Bachchan followed by Anil Kapoor’s run to the High Court