इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
युरोपीयन क्रिकेटच्या टी१० मॅचमध्ये स्पेशनच्या हमजा सलीमने ४३ चेंडूत १९३ धावा करण्याचा विक्रम केला आहे. यात १४ चौकार आणि २२ षटकारांचा समावेश आहे. क्रिकेटमध्ये नेहमी काही ना काही घडत असते. त्यात कमी चेंडूत जास्त धावा करणे खूप अवघड असते. त्यात हमजाने ही कामगिरी केली आहे. खरं तर १९३ धावाचा हा स्कोर सर्व आऊट झाल्यावर एका संघाचा ब-याच वेळा होता. पण, हमजाने केलेली ही कामगिरी विश्वविक्रमी अशीच आहे.
या अगोदर त्याने २०२१ मध्येही ९ चेंडूत १२० धावांची शानदार खेळी केली होती. २०२२ मध्ये ३९ चेंडूत १५५ धावा केल्या होत्या. २८ वर्षीय हमजाने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहे. पण, ५ डिसेबरला युरोपीयन क्रिकेटच्या टी१० मॅचमध्ये ४३ चेंडूत १९३ धावा करण्याचा विश्वविक्रम मात्र लक्षवेधी ठरला आहे.
या सामन्यात हमजा सलीम दार आणि यासिर अली हे दोघेही फलंदाजीला आले आणि १० षटकात एकही विकेट न गमावता २५७ धावा केल्या. टी २०, वनडे व टेस्ट क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आतापर्यंत झाले आहे. पण, हमजाच्या या विक्रमाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.