नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी शुक्रवारी कर्नाटकातील बेंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या एरो इंजिन संशोधन आणि विकास केंद्र (AERDC) येथील नवीन डिझाइन आणि चाचणी सुविधेचे उद्घाटन केले.
एरो इंजिन संशोधन आणि विकास केंद्रामध्ये (AERDC) सध्या दोन स्ट्रॅटेजिक इंजिनांसह अनेक नवीन इंजिने डिझाइन करण्यात आणि विकासित करण्यात येत आहेत. यामध्ये प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारी विमाने, मानवरहित विमाने, दोन इंजिन असलेली छोटी लढाऊ विमाने किंवा प्रादेशिक जेट विमाने यांच्यासाठी – २५ kN थ्रस्टचे हिंदुस्तान टर्बो फॅन इंजिन (HTFE) ; तसेच हलक्या आणि मध्यम वजनाच्या (३.५ ते ६.५ टन वजनाच्या एक किंवा दोन इंजिन असलेल्या) हेलिकॉप्टरसाठी १२०० kN थ्रस्ट चे हिंदुस्तान टर्बो शाफ्ट इंजिन (HTSE) यांचा समावेश आहे.
संरक्षण क्षेत्रामध्ये देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम क्षमतेवर सरकारचा विश्वास आहे, असे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने केलेल्या कामगिरीचे कौतुक करताना संरक्षण सचिवांनी सांगितले. उत्पादन क्षेत्र हे देशाचे भविष्य असून येत्या काही दशकांमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने सर्व प्रकारच्या विमानांसाठी आवश्यक तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही ते म्हणाले. युद्धाचे संपूर्ण स्वरुप बदलत आहे हे लक्षात घेऊन भविष्याचा विचार करण्याचा, असा सल्ला त्यांनी दिला.
“या सुविधेचा विकास हा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या प्रगतीच्या मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (अतिरिक्त प्रभार) सी बी अनंतकृष्णन म्हणाले. एरो इंजिन डिझाइन आणि विकासामध्ये ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची ही साक्ष आहे.” असे त्यांनी सांगितले.
या सुविधा केंद्राने लक्ष्य (मानवरहित विमान) ला उर्जा देणारे भारतातील पहिले स्वदेशी टर्बोजेट इंजिन PTAE-7 इंजिन, An-32 विमान सुरू करण्यासाठी लागणारे गॅस टर्बाइन इलेक्ट्रिकल जनरेटर GTEG-60, जग्वार विमानावर Adour-Mk 804E/811 सुरू करण्यासाठी एअर स्टार्टर ATS 37 आणि वायू उत्पादक तसेच जग्वार विमानाच्या Ad804/811 इंजिनला सपोर्ट करण्यासाठी ALH शक्ती प्रदान करण्यासाठी शक्ती इंजिन यशस्वीरित्या विकसित आणि प्रमाणित केले आहे.