नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वस्तू व सेवा कर कार्यालयातील राज्यकर अधिकारी जगदीश सुधाकर पाटील (३९) हे ४० हजाराची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. चित्रीकरणासाठी आलेले वाहने जीएसटीचा दंड न भरता सोडून दिल्याच्या मोबदल्यात ही लाच घेण्यात आली.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार यांचा जाहिरात चित्रीकरणाचा व्यवसाय आहे. ते जाहिरात चित्रीकरणाचे कामात व्यत्यय येऊन तक्रारदार यांचे पाच ते सहा लाखाचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून चित्रीकरणासाठी आलेले वाहने जीएसटी चा दंड न भरता सोडून दिल्याच्या मोबदल्यात वरील प्रमाणे लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून गुन्हा.
*यशस्वी सापळा कारवाई
*युनिट – नाशिक
*तक्रारदार- पुरुष
*आलोसे- जगदीश सुधाकर पाटील, वय 39 वर्षे, राज्यकर अधिकारी, वर्ग-2, वस्तू व सेवा कर कार्यालय, नाशिक
पत्ता :- फ्लॅट नंबर ९०२, एफ विंग, अनमोल नयनतारा सिटी दोन, फेज-2, कर्मयोगी नगर, नाशिक
लाचेची मागणी रक्कम व दिनांक :- 40,000/- रूपये दिनांक 04/09/ 2023
लाच स्वीकारली रक्कम व दिनांक– 40,000/- रूपये दिनांक-04/09/2023
लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांचा जाहिरात चित्रीकरणाचा व्यवसाय असून जाहिरात चित्रीकरणाचे कामात व्यत्यय येऊन तक्रारदार यांचे पाच ते सहा लाखाचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून चित्रीकरणासाठी आलेले वाहने जीएसटी चा दंड न भरता सोडून दिल्याच्या मोबदल्यात वरील प्रमाणे लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून गुन्हा.
आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी :-
मा.राज्यकर आयुक्त, वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई
सापळा अधिकारी
श्री स्वप्निल राजपूत ,पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
सापळा पथक–
पो.ना.प्रभाकर गवळी,
पो. ना. संदीप हांडगे,
पो. ना. प्रकाश महाजन,
सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक.
State tax officer of goods and services tax office caught in ACB’s net while taking bribe of 40,000