इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – ‘मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती’ हे गाणे आपण ऐकले आहे. पण खरेच पूर्वी भारतात सोन्याच्या खूप खाणी होत्या, असे सांगितले जाते. नव्या पिढीला असे काही बघायला मिळाले नाही. मात्र तरीही जगात सर्वाधिक सोने वापरणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. आता भारतात आणखी एक सोन्याची खाण लवकरच सुरू होणार आहे.
ही एक खासगी सोन्याची खाण असून जिओमिसोर सर्व्हिसेस इंडिया नावाची कंपनी ही खाण विकसित करीत आहे. या कंपनीला सोन्याचा शोध घेण्यासाठी जवळपास दहा वर्षे लागली. आंध्रप्रदेशातील कुर्नुल जिल्ह्यातील तुग्गली मंडलम् येथे जोनागिरी नावाची खासगी खाण म्हणून ही विकसित होत आहे. भारतात दरवर्षी जवळपास १.६ टन सोन्याचे उत्पादन होत असते. देशातील सर्वाधिक सोन्याचा साठा कर्नाटकात आहे. एहुटी आणि उटी येथील खाणीतून मोठ्या प्रमाणात सोने काढले जाते.
कर्नाटकात ८८ टक्के सोन्याचा साठा आहे तर आंध्रप्रदेशात १२ टक्के साठा आहे. विशेष म्हणजे झारखंडमध्येही काही प्रमाणात सोन्याच्या खाणी असल्याचे सांगितले जाते. आता नव्या खाणीमुळे कर्नाटकमधील टक्केवारीत वाढ होणार असल्याचे दिसत आहे. भारतात आवश्यक असलेले बहुतांश सोने आयात केले जाते. पण आता लवकरच सोन्याची आयात कमी होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षीपासून देशातील खासगी सोन्याच्या खाणीतून मोठ्या प्रमाणात सोने बाहेर पडू शकते. त्यातच आंध्रप्रदेशातील या खाणीचा समावेश असल्याचे सांगितले जाते. जिओमिसोर कंपनीमध्ये डेक्कन गोल्ड माईनचा जवळपास ४० टक्के हिस्सा आहे. डेक्कन गोल्ड माईन ही देशातील एकमेव आणि पहिली सोने शोधणारी कंपनी आहे.
पुढील वर्षी सोने बाहेर येणार
जिओमिसोर ही कंपनी पुढील वर्षीपर्यंत पूर्ण क्षमतेने सोन्याचे उत्पादन देऊ शकेल. दरवर्षी जवळपास ७५० किलो सोन्याचे उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. सध्या येथे प्रायोगिक तत्वावर सोने काढले जात आहे.
A new gold mine in this state… this private company got the job…