इंडिया दर्पण वृत्तसेवा
महाराष्ट्र शासन व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शहरातील नमामि गोदा फाउंडेशन, द सत्संग फाउंडेशन क्वालिटी कौन्सिलिंग ऑफ इंडिया, नाशिक झीलर्स, इंडियन स्वच्छता लीग अशा विविध स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून २ ऑक्टोबर व ३ ऑक्टोबर २०२३ रोजी गोदावरी अविरल निर्मल वाहती होण्यासाठी अविरल गोदावरी मोहीम राबविली जाणार आहे.
मोहिमेच्या पूर्व तयारीसाठी आज दिनांक २६ सप्टेंबर २०२३ रोजी मनपा मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.यावेळी मोहिमेचे ब्रॅड अँबेसिडर चिन्मय उदगीरकर उपस्तित होते. यावेळी त्यांना कार्यक्रमाविषयी माहिती दिली. कार्यक्रमासाठी नाशिक त्रंबक नगरी ठेवूया हिरवीगार,गोदामाईची पवित्रता आपण जपू आपल्या जीवपाड,सजग आहे नाशिककर पर्यावरण प्रेमी जोशपूर्ण वातावरण गोदावरी स्वच्छतेची घेऊ हमी, अशा प्रकारे स्लोगन देण्यात आलेली आहे. २ ऑक्टोबरला सकाळी ७ ते १० यावेळेत स्वछता अभियान रामकुंड परिसर,पंचवटी येथे राबविली जाणार आहे.सायंकाळी ४.३० वाजता माय ट्री चे उदघाटन एस्पालायर हेरिटेज येथे कार्यक्रम होणार आहे.
सायंकाळी ६.३० वाजता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक व क्रियायोगाचे गुरू तसेच पाणी चळवळीचे प्रणेते श्री एम आध्यत्मिक गुरु श्री . एम हे अध्यात्म व सेवा या विषयावर कुर्तकोटी सभागृह येथे संवाद साधणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ, रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते, पाणीवाले बाबा म्हणून संपूर्ण भारतवर्षात प्रसिद्ध असलेले डॉ.राजेंद्र सिहं,वॉटरमॅन ऑफ इंडिया हे उपस्थित राहणार आहे.
तसेच ३ ऑक्टोबर रोजी चला जणूयात नदीला अंतर्गत प्राचीन कुंडांचे पुनर्जीवन जंगल पूर्वरत करण्याचे अभियान त्रंबकेश्वर येथे डॉ.राजेंद्र सिहं व श्री. एम यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.तसेच विविध कार्यक्रम पार पडणार आहे. ब्रह्मगिरी ते राज महेंद्री दरम्यान अविरल गोदावरीसाठी सुरू केलेल्या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात येत्या २ ऑक्टोबरला शहरात प्लास्टिक संकलन केले जाणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने नमामी गोदा आणि सत्संग फाउंडेशनतर्फे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्व नाशिकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक मनपाने व अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी केले .यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, गोदावरी संवर्धन विभागाचे उपायुक्त विजयकुमार कुमार मुंडे, उपायुक्त प्रशांत पाटील, घनकचरा व व्यवस्थापक विभागाचे संचालक डॉ.आवेश शिक्षण अधिकारी बी टी पाटील जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, अभिनेता चिन्मय उदगीरकर, क्रेडाईचे अध्यक्ष कृणाल, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, अनिल गायकवाड, उद्योजक हेमंत राठी आदी उपस्थित होते.