नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फ्लिफकार्ट कंपनीचे संलग्न असलेली इस्टाकार्ड कंपनीत डिलेव्हरीसाठी आलेल मोबाईलच्या पार्सलमध्ये त्याच वजनाची फरशी टाकुन तो पुन्हा पॅक करणा-या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. मोबाईचे पार्सल ग्राहकांची डिलेव्हरी न झाल्याचे सांगुन ते पार्सल पुन्हा कंपनीत जमा करुन अपहार करून हे मोबाईल बाजारात विकत असे. या सर्व प्रकरणात कंपनीचे डिलेव्हरी बॅाय पासून इतर कर्मचारी सामील आल्याचे समोर आले. पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना अटक केली असून त्यांनी गुन्हयाची कबुली दिली आहे. या आरोपींकडून आतापर्यंत ३ लाख ६ हजार ५८२ रुपये एकुण किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात १० मोबाईल आहेत.
या घटनेत फ्लिफकार्ट कंपनीचे संलग्न असलेली इस्टाकार्ड कंपनीचे नाशिक शाखेचे मॅनेजर दिनेश ज्ञानेश्वर पाटील यांनी गंगापुर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती. त्यात फ्लिफकार्ट कंपनीतून डिलीव्हरी करीता आलेले आयफोन कंपनीचे व इतर कंपनीचे ५१ मोबाईलचा त्यांचे कंपनीमध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून काम करणारा बळीराम रावजी खोकले याने सदरचे मोबाईल फोन हे डिलेव्हरी न करता त्यांना परस्पर काढून घेऊन अपहार केल्याचे म्हटले होते. यावरून गंगापुर पोलीस ठाणे येथे ८ जून रोजी गुन्हा दाखल झाला होता. काही दिवसानंतर सदरचा गुन्हा पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे आदेशानुसार तपासकामी गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ नाशिक शहर यांचेकडे वर्ग करण्यात आला होता.
त्यानंतर तपासात सदरचा गुन्हा फ्लिफकार्ट कंपनीतीचे पार्सल डिलेव्हरी करणारी संलग्न कंपनी इन्टाकार्ड कामगारच करीत असल्याचे व त्याचे रॅकेट असल्याचे उघडकीस आले. यात आरोपी आकाश गोविंद शर्मा (२४) रा. संत तुकाराम नगर, मातोश्री पार्क, भोसरी, पुणे, शुभम विनायक नागरे (२७), रा. गिताई निवास, पिंपळगाव बहुला, सातपुर, नाशिक, निखील मंगलदास पाथरवट (३२) रा. फ्लॅट नं. ३, श्रीयोग अपार्टमेंन्ट(अंजनी), रायबा हॉटेल च्या मागे, पाथर्डी रोड, नाशिक, निखील सतीश मोरे (३०), रा. फ्लॅट नं. ६, वरद अपा. तिडके नगर, टवाडी, नाशिक, अमोल शिवनाथ खैरे ( धारण केलेले नाव – बळीराम रावजी खोकले (२३) रा.म्हाडा कॉलनी, फ्लॅट नं. ३०२, नैनिका स्कुल जवळ, नाशिक पुणा रोड, चेहडी शिवार, नाशिक यांना गुन्हयात अटक करण्यात आली. यातील आकाश गोविंद शर्मा हा पुण्यातील सराईत तडीपार गुन्हेगार असून तो सध्या भोसरी पोलीस स्टेशनच्या गुन्हयात मोक्का कायदयान्वये अटकेत होता. त्याचा न्यायालयाकडून ताबा घेऊन सदरच्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
असे नाव बदलून लावले कामाला
गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील पोउनि उगले हे सदर गुन्हयाचा तपास करत असतांना असे निष्पन्न झाले की, फिर्यादीत नमुद असलेला बळीराम खोकले नावाचा हा सदर कंपनीत कधी कामास नव्हता. त्यांच्या नावाचा वापर करून कोणीतरी अनोळखी इसमाने सदरचा गुन्हा केला आहे. त्यावर अधिक तपास करता असे निष्पन्न झाले. कॅशिफाय या ऑनलाईन जुने मोबाईल खरेदी विक्री कंपनीत काम करणारा निखील पाथरवट व सदर कंपनीमध्ये पूर्वी काम करणारा आकाश शर्मा यांनी एकत्र मिळुन फ्लिफकार्ट कंपनीचे नाशिक विभागातील संलग्न असलेल्या इस्टाकार्ड कंपनीचे एच.आर विभागात काम करणारा निखील मोरे यांच्याशी संमनमत केले. व त्यांच्या ओळखीचा अमोल खैरे यास कंपनीमध्ये बळीराम खोकले नावाने कामास लावले होते.
असे होते सर्व सामील
बळीराम खोकले नावाने काम करीत असलेला अमोल खैरे हा कंपनीमध्ये आलेले मोबाईलचे पार्सल डिलेव्हरी करीता बाहेर घेऊन जात असे त्यानंतर आकाश शर्मा व निखील पाथरवट त्यामधील मोबाईल काढून घेऊन त्यात मोबाईलच्या वजनाची फरशी टाकुन तो पुन्हा पॅक करत असे सदर पार्सल ग्राहकांची डिलेव्हरी न झाल्याचे सांगुन ते पार्सल पुन्हा कंपनीत जमा करायचे अशा पध्दतीने अपहार करून काढलेले मोबाईल निखील पाथरवट विक्री करायचा तसेच सदर कंपनीमध्ये डिलव्हरी बॉय म्हणून कंपनीत काम करणारा शुभम नागरे यास देखील सामिल करून त्यांनेही कंपनीत आलेले काही मोबाईल काढून निखील पाथरवट यास विक्री करीता दिले. या सर्व कामात त्यांना एच.आर विभागात काम करणारा निखील मोरे हा मदत करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
यांनी उघड केले रॅकेट
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव, सहा.पोलीस आयुक्त डॉ.सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सपोनि हेमंत तोडकर,पोउनि चेतन श्रीवंत, पोउनि, विष्णू उगले, सपोउनि रविंद्र बागुल, सुरेश माळोदे, किरण शिरसाठ, पोहवा प्रदिप म्हसदे, जनार्दन सोनवणे, योगीराज गायकवाड, धनंजय शिंदे, नाजीम पठाण,पोना महेष साळुंके, प्रशांत मरकड, विशाल देवरे, विशाल काठे, पोअं/अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख यांनी हे रॅकेट उघड केले आहे.
Flipkart workers’ racket exposed; 5 people arrested, goods worth 3 lakh seized