नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सणासुदीचे दिवस दिवसात अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्नपदार्थाबाबत धडक मोहिम हाती घेतली आहे. जनतेस राणासुदीच्या दिवसात दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत याचाच भाग म्हणून शुक्रवारी अन्न औषध प्रशासनाचे पथक सकाळी ५ वाजेपासून व्दारका सर्कल येथे प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) संभानारागुडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने प्रशासनाचे पथक त्याठिकाणी तैनात होते. त्याठिकाणी गुजरात वरून येणा-या खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेसची तपासणी केली असता बलदेव ट्रॅव्हल्स व श्रीविजय ट्रॅव्हल्स यामधुन अहमदाबाद, गुजरात येथून सदर प्रकारचे अन्नपदार्थ वाहतूक करून आणून रॉयल एक्प्रेस ट्रॅव्हल्स यांचे ऑफिसजवळ उतरवण्यात आला.
सदर गुजरात मधून आलेल्या या मिठाईचा वापर शहरातील मिठाई विक्रेते हे मिठाई, मलाई पेढा, मलाई बर्फी, कलाकंद इ. तयार करण्यासाठी करतात असा अन्न व औषध प्रशासनाला दाट संशय असल्याने व त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दुधाचा समावेश नसल्याने तसेच अशा पदार्थाची वाहतूक करतांना अन्न सुरक्षा व मानके कायदयाच्या तरतुदींचा भंग केल्याने या अन्नपदार्थाचा खालीलप्रमाणे साठा अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहिम राबवून जप्त केलेला आहे
जप्त केलेला साठा
१) मे. अनुष्का स्वीट सप्लायर्स, रविकांत रामदास सिंग, जेलरोड,
नाशिक यांचेकडून स्पेशलबर्फी (श्री कन्हैया) – ११
HDPE Bags किंमत ४१००० रुपये
२) मे. डीलिशियन स्वीटस, (श्री श्याम) 3 HDPE Bags किंमत ११००० हजार रुपये
३) हलवा (श्री कन्हैया ) 5 Boxs, किंमत १७ हजार २९० रुपये
असा एकुण ६९ हजार २९० रुपयाचा साठा जप्त केला. त्यानंतर सोनाका ॲग्रो फुड, व्दारका, नाशिक, मालक संदेश जे. कासलीवाल यांनी मागविलेल्या मिठाईच्या साठयातून रिच स्वीट डिलाईट Analog (राधे) चा २९८ किलो व २५० किलो, किंमत ७४ हजार ५०० इतका साठा जप्त केला. त्यानंतर सोमाभाई कल्पेश नवरतन गुप्ता, रा. गुरुगोविंद कॉलेजजवळ, इंदिरानगर, नाशिक यांचेकडून गोकुळ (Traditional Sweets) चा १४ पॅकेटस, १४८ किलो किंमत २९ हजार ६०० रुपयाचा साठा नमुना घेवून जप्त केला. त्यानंतर लच्छाराम मानाराम चौधरी, मे. महालक्ष्मी स्वीटस्, जेलरोड, नाशिक यांनी मागविलेल्या कलाकंद स्वीटस् याचा नमुना त्यांचेकडून घेवून ५८ किलो किंमत १३ हजार ९२० इतका जप्त केला. असा एकुण २ लाख १० हजार ९१० रुपये किंमतीचा साठा जप्त करुन ठेवण्यात आला.
सदरची कार्यवाही ही सर्वश्री अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन, उमेश सूर्यवंशी, अमित रासकर, प्रमोद पाटील तसेच सर्वश्री सहायक आयुक्त (अन्न) उ. सि. लोहकरे, मनिष सानप व नमुना सहायक विकास विसपुते यांनी श्री सं. भा. नारागुडे, सह आयुक्त (अन्न) यांचे मार्गदर्शनाखाली केली.
एफडीएचे आवाहन
अन्न व औषध प्रशासनातर्फे सणासुदीच्या काळात आवाहन यावेळी करण्यात आले. नागरीकांनी दुधापासून तयार झालेली मिठाई खरेदी करतांना खरोखर त्यामध्ये दुध, खवा, मलई किंवा इतर दुग्धजन्य पदार्थापासून तयार केलेले आहेत किंवा कसे याची खात्री करुनच खरेदी करावे त्याचप्रमाणे सर्व मिठाई विक्रेत्यांनी दुधापासूनच बनविलेली मिठाईची विक्री करावी अथवा दुधापासूनच्या न बनविलेल्या मिठाई विक्रीसाठी ठेवल्यास त्याबाबत स्पष्ट फलक दुकानात लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याबाबत प्रशासनामार्फत मिठाई विक्रेत्यांच्या असोसिएशनची बैठक घेण्यात आलेली असून त्याबाबत त्यांच्या मार्फतही ही बाब मिठाई विक्रेत्यांना कळविण्याबाबत सुचित करण्यात आले होते. नागरीकांना अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत काहीही संशय असल्यास प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक 1800222365
2 lakh 10 thousand stocks of sweets coming from Gujarat seized