नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न व औषध प्रशासनाच्या धाडीत गुजरातहून आलेला तीन लाखाचा हलवा व स्विटस जप्त करण्यात आले. नाशिक अन्न व औषध प्रशासन व स्थानीक गुन्हे शाखा, नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. पेठ रस्त्यावर वाहन क्रमांक एमच १५ एचएच ००२१ बोलेरो या वाहनातून गुजरातमधून सणासुदीच्या काळात गुजरात उत्पादीत हलवा (Sweets) व स्विटस (खडोल) याचा एकुण ५० बॅग साठा हा नाशिककडे विक्रीसाठी वाहतूक करीत असतांना ही धाड टाकण्यात आली. ही मिठाईची वाहतूक करणा-या वाहनाला थांबवण्यात आले. त्यानंतर तपासणी केली असता वाहनास अन्न पदार्थ वाहतूकसाठी अन्न परवाना आढळून आली नाही.
त्यानंतर वाहनात असलेल्या हलवा व स्विटसची तपासणी केल्यानंतर अन्न पदार्थाची वाहतूक आवश्यक तापमानास न केल्याने वरील दोन्ही अन्न पदार्थाचे अन्न नमुने अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी विश्लेषणासाठी घेऊन सदरचा साठा जप्त केला. यात हलवा (Sweets) ११९८ किलो असून त्याची २ लाख ३९ हजार ६०० रुपये इतकी आहे. तर स्विटस (खडोल) चा २९८ किलो असून त्याची किंमत ६२ हजार ५८० रुपये इतकी आहे. एकुण ३ लाख २ हजार १८० रुपयाचा माल जप्त करुन ताब्यात घेण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी सह आयुक्त नाशिक विभाग, सं.भा. नारागुडे, विवेक पाटील, सहायक आयुक्त (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
3 lakh transfer from Gujarat and confiscation of suits