मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ईडीने मुंबईसह विविध राज्यात महादेव ऑनलाईन बेटींग ऍपशी सबंधित ३९ ठिकाणी छापेमारी केली आहे. ईडीच्या छापेमारीमुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आले आहे. यात टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली यांच्यासह अनेक दिग्गज कलाकरांची नावे समोर येत आहे. याप्रकरणी ईडीने मनी लाँन्ड्रींगचा गुन्हा दाखल करत ही चौकशी सुरु केली आहे. याप्रकरणात आता १४ सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत.
देशातील कोलकाता, रायपूर, छत्तीसगड, भोपाळ येथे हे छापे टाकण्यात आले असून ४१७ कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता जप्त केली आहे.
महादेव ऑनलाईन बेटींग ऍपच्या माध्यमातून परदेशात करण्यात आलेल्या इव्हेंटसाठी सेलिब्रिटींना दिलेले मानधन रोख रकमेतून देण्यात आले. हे सगळे पैसे दोन नंबरचे असल्याचा संशय आहे. हॉटेल बुकिंग इतर पैसे रोख देण्यात आल्याची सध्या चर्चा रंगली आहे.
या सेलिब्रिटींना लवकरच समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. महादेव ऑनलाइन गेमिंग अॅपमध्ये मनी लाँड्रिंगसंदर्भात एका भव्य लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरच्या लग्नसोहळ्यातील आहे. मुख्य आरोपी हा अॅपच्या संस्थापकांपैकी एक आहे. सौरभ चंद्रकरच्या लग्नसोहळ्याला अनेक कलाकार उपस्थित होते. या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ आणि कलाकारांची यादी आता समोर आली आहे. लग्नाचा खर्च ईडीच्या स्कॅनरखाली असून गेमिंग अॅपवरुन बेकायदेशीर रोख रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे.
Many veteran Bollywood actors on ED’s radar; Raid in 39 places in various states including Mumbai.