इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – जगभरात विज्ञानाने कितीही मोठी प्रगती केली असली तरीही जवळपास चारशे वर्षांपूर्वी ज्या आठव्या खंडाचा शोध लागला होता, तो खंड शोधाायला तब्बल ३८१ वर्षे लागली. आफ्रिका, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, आशिया, अंटार्क्टिका आणि आर्क्टिक या सात खंडांमध्ये आता पृथ्वीवरील झिलँडिया या आठव्या खंडाचाही समावेश झाला आहे.
डच व्यापारी अबेल तस्मान याने झिलँडिया नावाचा आठवा खंड अस्तित्वात असल्याचे ३८१ वर्षांपूर्वी सांगितले होते. १६४२ मध्ये त्याची अधिकृत नोंद करण्यात आली. पण त्यानंतर कित्येक वर्षे शास्त्रज्ञ या खंडाच्या शोधात होते. पृथ्वीवर आठवा खंड आहे, पण तो दिसत नसल्याने शास्त्रज्ञ अस्वस्थ होते. त्याचे मुख्य कारण म्हणजे या खंडाचा बहुतांश भाग पाण्याखाली होता. त्यामुळे तो दिसण्याचा प्रश्नच नव्हता.
या खंडाला झिलँडिया किंवा रिऊ-ए-मोई अशा दोन्ही नावांनी संबोधले जाते. न्युझीलंड येथील जीएनएस सायन्स या संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ अँडी टुलोच यांचा झिलँडिया खंड शोधण्याच्या मोहिमेत मोठा वाटा ठरला आहे. ४९ लाख किलोमीटर क्षेत्रफळ असलेला हा खंड जगातील सर्वांत लहान व निमुळता खंड मानला जात आहे. ९४ टक्के खंड हा समुद्राच्या खाली असल्यामुळे त्याचे वयोमानही कमी असल्याची नोंद करण्यात आली आहे.
डच खलाशी अबेल तस्मान हा दक्षिणेकडील मोठ्या खंडाच्या शोधात निघाला असताना न्यूझिलंडमधील स्थानिकांनी त्याला याची माहिती दिली होती. पण त्यानंतर त्याच्या शोधावर शिक्कामोर्तब करण्यासाठी एवढी वर्षे उलटून गेली.
गोंडवाना महाखंडाचा भाग
भारतीय संस्कृती जगात अतिप्राचीन मानली जाते. अर्थात कोट्यवधी वर्षे जुना शोध लागला तरी त्याचा कुठे ना कुठे भारताशी संबंध असतोच. झिलँडिया या आठव्या खंडाच्या बाबतीतही तसेच आहे. या खंडावरील दगडांचा अभ्यास केल्यानंतर ५५ कोटी वर्षांपूर्वी झिलँडियाची निर्मिती झाली होती, हे निष्पन्न झाले. पण त्याचवेळी हा खंड प्राचीन गोंडवाना महाखंडाचा भाग होता, अशीही नोंद करण्यात आली आहे.
भारतातून घेतले नाव
गोंडवाना खंडाचे नाव ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ एडुआर्ड सूस यांनी मध्य भारतातील गोंडवाना नावाच्या प्रदेशावरून ठेवले. काही शास्त्रज्ञ प्रदेश आणि खंड यांच्यातील स्पष्ट फरक सांगण्यासाठी ‘गोंडवानालँड’ या शब्दाचा वापर करतात. संस्कृतमध्ये गोंडांचे जंगल असा त्याचा अर्थ होतो, अशी माहिती विकिपिडियावर आढळते.
The eighth continent on Earth has finally been found! Such is the relationship with India…