इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नुकत्याच झालेल्या शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी ‘डंकी’ चित्रपटाच्या ‘ड्रॉप 1’ नावाच्या टीझर रिलीज झाले आहे. मुंबईतील एका फॅन इव्हेंटमध्ये हा रिलीज सोहळा झाला. यावेळी त्याच्या चाहत्यांनी धुमधडाक्यात त्याचा वाढदिवस साजरा केला .
या सोहळ्यात शाहरुख ‘डंकी’ बद्दल भरभरुन बोलला. यावेळी त्याच्यासोबत ‘डंकी’चे निर्माते राजकुमार हिराणी आणि लेखक अभिजात जोशी हेही उपस्थित होते. ‘डंकी ड्रॉप 1’ या चित्रपटाच्या टीझरबद्दल बोलताना शाहरुख खान म्हणाला की , “दो-ढाई साल से हम ‘डंकी’ बना रहे हैं और आज उसकी पहली झलक, उसका पहला ड्रॉप, ‘डंकी’ ड्रॉप’ ! क्योंकी हम इतने कूल हैं की हम भी ड्रॉप बोलते हैं. डंकी ड्रॉप 1 आ चुका हैं और आगे भी अपनी चीज दिखाते रहेंगे.” ‘डंकी’ च्या निमित्ताने शाहरुख खान राजकुमार हिराणी यांच्याबरोबर प्रथमच काम करत असल्यामुळे या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता आहे.
शाहरुखने शेअर केला व्हिडिओ
याबद्दलचा व्हिडिओ शेअर करताना, SRK ने X वर लिहिले आहे की, ” साध्या आणि खऱ्या लोकांची हि कथा आहे. त्यांची स्वप्ने, इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असलेली आणि मैत्री, प्रेम , एकत्र असण्याची तसेच घर नावाच्या नात्यात असण्याची हि एक हृदयस्पर्शी कथा आहे. या प्रवासाचा एक भाग बनणे हा माझ्यासाठी एक सन्मान आहे आणि मला आशा आहे की तुम्ही सर्व आमच्यासोबत याल. ‘डंकी’ या ख्रिसमसला जगभरातील सिनेमांमध्ये प्रदर्शित होत आहे.”
‘डंकी’ बद्दल
‘डंकी’ हा जिओ स्टुडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिराणी फिल्म्स प्रस्तुत चित्रपट आहे, याची निमिर्ती राजकुमार हिराणी आणि गौरी खान यांनी केली आहे. अभिजात जोशी, राजकुमार हिराणी आणि कनिका धिल्लन यांनी लेखन केले आहे. या चित्रपटात शाहरुख खानसह बोमन इराणी, तापसी पन्नू, विकी कौशल, विक्रम कोचर, अनिल ग्रोव्हर यांचा समावेश आहे. ‘डंकी’ डिसेंबर २०२३ मध्ये रिलीज होणार आहे.
The teaser of actor Shahrukh Khan’s ‘Dunky’ is going viral everywhere…