दिवाळीत या गोष्टी लक्षात ठेवा अशा ११ टीप्स ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी दिल्या आहे. त्या खालीलप्रमाणे आहे.
१) घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये विशिष्ट स्पंदने असतात ती नेहमी समोरच्या व्यक्तीवर आढळत असतात तसेच आपली स्पंदने त्यांच्यावर आदळतात. स्पदंने चांगली तर काही स्पंदने वाईट असतात याला आपण ऑरा असे म्हणतो हा ऑरा नेहमी पॉझिटिव्ह राहावा म्हणून नेहमी चांगले बोलावे चांगले वागावे घरात नेहमी सकारात्मक, पॉझिटिव्ह विचार ठेवावे कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते
२) दिवाळीची खरेदी करताना फॅशनच्या नावाखाली घरात दरिद्री आणू नये सांगण्याचे तात्पर्य फाटके कपडे घेऊ नये
३) जर आपल्याला कायम धनप्राप्ती हवी असेल तर स्त्रियांचा सन्मान तसेच घरात स्वच्छता ठेवणे हा जीवनाचा भाग करायला हवा
४) लक्ष्मी मातेला अंधार आवडत नाही ती अंधारातून प्रकाशाच्या दिशेने चालत असते म्हणून नेहमी घरात स्वच्छ प्रकाश असावा
५) लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री यंत्रावर विधिवत पूजा करून महिन्यातून एकदा तरी अष्टमी तिथीला लक्ष्मी मंदिरात जाऊन तेथे दर्शन घ्यावे
६) या काळामध्ये कनकधारा स्तोत्र लक्ष्मी अष्टक किंवा लक्ष्मी स्तुती ऐकावी
७) वसुबारस पासून उठणे लावण्यास सुरुवात करावी यामुळे ग्रहदोष पिडा निवारण होण्यास मदत मिळते
८) धनत्रयोदशीपासून हळद आणि तांदूळ मिक्स करून रांगोळी काढावी या दिवशी एखादी चांदीची वस्तू स्वयंपाक घरासाठी घ्यावी
९) नरक चतुर्दशीच्या दिवशी जुन्या झाडूने घर झाडून तो बाहेर काढावा व अलक्ष्मी निरसरण असे म्हणावे तो झाडू परत घरात घेऊ नये
१०) पाडव्याला पतीने पत्नीला व पत्नीने पतीला मध खाऊ घालावे यामुळे दोघांमध्ये वर्षभर मधुरता राहते पत्नीला एखादी भेटवस्तू द्यावी अत्तर गजरा किंवा तिला आवडेल ती वस्तू आपण भेट म्हणून देऊ शकता
११) आपल्या आयुष्यातील अष्टलक्ष्मी ,
धनलक्ष्मी- धनासाठी म्हणून धनाची पूजा,
यशलक्ष्मी– निरोगी प्रकृतीसाठी आपल्या इच्छित पदासाठी,
आयुष्य लक्ष्मी– आयुष्य निरोगी होण्यासाठी
वाहन लक्ष्मी- वाहन सौख्या साठी संरक्षणासाठी,
स्थिरलक्ष्मी –धनधान्य, स्थावर इस्टेट,
गृहलक्ष्मी– पत्नीचा आदर करण्यासाठी घरातील स्त्रियांचा मान सन्मान ठेवण्यासाठी,
संतान लक्ष्मी- संतानप्राप्ती व त्यांचे आरोग्य जपण्यासाठी,
भवन लक्ष्मी– आपल्या छानशा वास्तूमध्ये कुणाची कुदृष्टी पडू नये म्हणून या लक्ष्मीची पूजा करावी
आकाश कंदील का लावावा-
हा प्रकाशाचा ऊर्जेचा उत्सव तिमिराकडून तेजाकडे नेणाऱ्या माणसाच्या सकारात्मक दृष्टिकोनाचा उत्सव आणि माणसाच्या इच्छाशक्तीचे प्रतीक म्हणजे आपण लावलेला आकाश कंदील, वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक म्हणजे आकाश कंदील, दिवाळीच्या निमित्ताने मनाने एकत्र येऊन प्रकाश रुपी सकारात्मक बीज रुजवून पुढचं वर्ष आनंदात व्यतीत करण्याच्या इच्छेचा हा आनंदी क्षण या क्षणाचे साक्षीदार म्हणून वास्तूवर लावलेले प्रतीक म्हणजे आकाश कंदील.