इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काँग्रेस नेते राहुल गांधी हे गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी संवाद साधतांना दिसत आहे. आज ते दिल्लीतील कीर्तीनगर येथे असलेल्या आशियातील सर्वात मोठ्या फर्निचर मार्केटमध्ये गेले. येथे ते सुतार बांधवांना भेटले. या भेटीबद्दल ते बोलले की, कठोर परिश्रम करण्याव्यतिरिक्त, ते आश्चर्यकारक कलाकार देखील आहेत – सामर्थ्य आणि सौंदर्य कोरीव काम करणारे तज्ञ सुध्दा. आम्ही खूप बोललो, त्याच्या कौशल्याबद्दल थोडे जाणून घेतले आणि थोडे शिकण्याचा प्रयत्न केला.
काही दिवसापूर्वीच त्यांनी दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्टेशनवर पोहोचून हमालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हमालांचा लाल गणवेश परिधान केला होता. इतक्यावरच ते थांबले नाही तर हातात त्यांनी ७५६ नंबरचा बिल्ला देखील लावला सामान सु्ध्दा उचलले होते. त्यामुळे त्यांची ही हमालाची भेट चांगलीच चर्चेची ठरली होती.
त्यायाअगोदर राहुल गांधी यांनी हरियाणातील सोनीपतमधील मदिना गावात भाताची लागवड केली. त्यानंतर ट्रॅक्टर चालवून शेतात भाताची पेरणी केली. तर काहीवेळा ते गॅरेजमध्ये दिसले. एकदा तर ते ट्रकमधून प्रवास करतांना सगळ्यांनी बघितले. गेल्या काही दिवसात ते वेगवेगळ्या व्यवसायातील नागरिकांशी भेट घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. त्यांचीशी ते सविस्तर चर्चाही करतात याअगोदर त्यांच्या अशा भेटी चर्चेत राहिल्या आहेत.
Congress leader Rahul Gandhi met carpenters in Delhi…