इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काँग्रेस नेते राहुल गांधी हे गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी संवाद साधतांना दिसत आहे. आज त्यांनी दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्टेशनवर पोहोचून हमालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हमालांचा लाल गणवेश परिधान केला. फक्त गणवेश परिधान केला. इतक्यावरच ते थांबले नाही तर हातात त्यांनी ७५६ नंबरचा बिल्ला देखील लावला. त्यामुळे त्यांची ही हमालाची भेट चांगलीच चर्चेची ठरली.
याअगोदर राहुल गांधी यांनी हरियाणातील सोनीपतमधील मदिना गावात भाताची लागवड केली. त्यानंतर ट्रॅक्टर चालवून शेतात भाताची पेरणी केली. तर काहीवेळा ते गॅरेजमध्ये दिसले. एकदा तर ते ट्रकमधून प्रवास करतांना सगळ्यांनी बघितले. गेल्या काही दिवसात ते वेगवेगळ्या व्यवसायातील नागरिकांशी भेट घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. त्यांचीशी ते सविस्तर चर्चाही करतात याअगोदर त्यांच्या अशा भेटी चर्चेत राहिल्या आहेत.
पण, आजची भेट जास्तच चर्चेची ठरली. या भेटीत त्यांनी हमालाचा गणवेश परिधान केला व बिल्लाही लावला. राहुल गांधी यांची भारत जोडा यात्रा झाल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्याचे प्रमाण कमी झाले असले, तरी त्यांना ट्रोल करणारे कमी नाही. पण, अशातही त्यांच्या भेटी व संवाद सुरु आहे.
Rahul Gandhi’s visit to Hamal is in discussion