माणिकराव खुळे
१-अरबी समुद्रात केरळ राज्यातील कोचीन-अल्लेप्पी अक्षवृत्तच्या दरम्यान पण लक्षद्विप बेटांच्याही अति पश्चिमेकडे आज तयार झालेले कमी दाब क्षेत्र एका आठवड्यात म्हणजे २६ ऑक्टोबर नंतर पुढील पायऱ्यांमध्ये विकसित होवून ओमानच्या दिशेने निघून जाण्याची शक्यता असुन महाराष्ट्रावर पावसासाठी त्याचा कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही.दक्षिण पाकिस्तान अथवा कच्छ किनारपट्टीमार्गे देशाच्या भू-भागावर प्रवेशित होण्याची शक्यता कमी जाणवते.
२-बं. उपसागरात श्रीलंकेच्या कोलोम्बो शहराच्या अक्षवृत्तावर पश्चिमेकडे दक्षिण ब्रम्हदेशाच्या पश्चिम किनारपट्टीवर आज तयार झालेली चक्रीय वाऱ्याची स्थितीचे रूपांतर २१ ऑक्टोबरला कमी दाब क्षेत्रात रूपांतर होवून नंतर पुढील पायऱ्यांमध्ये विकसित होवून दक्षिण बांगलादेशाकडे दिशेने निघून जाण्याची शक्यता असुन महाराष्ट्रावर पावसासाठी कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. वायव्येकडून भुवनेश्वर मार्गे देशाच्या भू-भागावर प्रवेशित होण्याची शक्यता कमी जाणवते.
३– ऑक्टोबर २५ पर्यन्त महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा परिणाम कायम असु शकतो, परंतु त्यानंतर होणाऱ्या बदलाच्या निरीक्षणावरून पुढील ऑक्टोबर हिटचा परिणामाच्या भाकीत कळवले जाईल.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.)
IMD Pune.
What will be the effect of cyclone in Arabian sea on Maharashtra?