शुक्रवार, ऑगस्ट 29, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आनंदाची बातमी….नाशिकच्या या क्रिकेटपटूंना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचे पारितोषिक जाहीर

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 12, 2023 | 12:22 pm
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


इंडिया दर्पण ऑनालईन डेस्क
नाशिक क्रिकेटसाठी अतिशय आनंदाची व अभिमानाची बातमी. नाशिकचा डावखुरा फिरकीपटू व अष्टपैलु खेळाडू, भरवशाचा नामवंत रणजीपटू सत्यजित बच्छाव, १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाची २०२२-२३ ची कर्णधार ईश्वरी सावकार व उदयोन्मुख युवा खेळाडू साहिल पारख यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन – एम सी ए- चे २०२२ वर्षा साठीचे सर्वोत्कृष्ट – बेस्ट – क्रिकेटपटू चे पारितोषिक मिळाले आहे .

सत्यजित बच्छाव या वर्षी देखील महाराष्ट्र संघातर्फे सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी -T-20 – स्पर्धेकरिता निवडण्यात आला आहे हे नुकतेच जाहीर झाले. ११ ते २२ ऑक्टोबर मोहली, चंदिगड येथे ही स्पर्धा होणार आहे. २०१८-१९ ह्या वर्षी या स्पर्धेत सत्यजित बच्छाव सर्वाधिक बळी मिळवत महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत नेण्यासाठी मोठा हातभार लावला होता व महाराष्ट्राने या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सत्यजित हा महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज झालेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू , केदार जाधवच्या नेतृत्वा खाली महाराष्ट्र संघात सत्यजितची निवड झाली आहे. या स्पर्धेतूनच आयपीएल स्पर्धेत खेळण्याची संधी उपलब्ध होते. मागील सहा-सात वर्षांपासून मुश्ताक अली स्पर्धेत सत्यजित सातत्याने उत्कृष्ठ कामगिरी करत असल्यानेच गेली काही वर्षे आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत त्याचा समावेश होत आहे.

20231012 115728 COLLAGE 1 1

आय पी एल लिलावात, २० लाख इतकी कमीतकमी बोली किंमत मिळणार्‍या खेळाडुंच्या, आतापर्यंत प्रतिनिधित्व न केलेल्या गटात त्याचा समावेश होता. त्याबरोबरच आय पी एल २०२२ च्या हंगामासाठी महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स – सी एस के – तर्फे संघाच्या शिबिरासाठी निवड झाली होती. सत्यजितला चेन्नई सुपर किंग्सने गोलंदाजी विशेषज्ञ म्हणुन संघाच्या शिबिरात खास निमंत्रित केले होते. गेल्या २०२२ च्या हंगामात मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेच्या काही सामन्यांत सत्यजितने महाराष्ट्राचे कर्णधारपद देखील भूषवले होते. जानेवारी २०१६ तील सर्विसेस विरुद्ध कटक येथे सुरू झालेल्या ,आतापर्यंतच्या टी-ट्वेंटी च्या कारकिर्दीत सत्यजितने ४६ सामन्यातील ४५ डावात एकूण ६२ बळी घेतले असून १८ धावात ४ बळी हि त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

मागच्या २०२२-२३ च्या हंगामात सत्यजितच्या नेतृत्वात त्याच्या अष्टपैलु खेळामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत ( एम सी ए सिनियर इन्विटेशन लीग ), नाशिकने विजेतेपद पटकावले होते. नाशिक जिल्हा संघाने साखळी व अव्वल साखळीत – लीग व सुपर लीग – सामन्यांत जोरदार कामगिरी करत स्पर्धेत सहभागी महराष्ट्राचे २१ जिल्हे व २७ नामवंत क्लबज् अशा एकूण ४८ संघांमध्ये सर्वाधिक गुण मिळवत प्रथम स्थान पटकवले होते. कर्णधार सत्यजित बच्छावने स्पर्धेत उत्कृष्ट नेतृत्वाबरोबरच अष्टपैलू चमक दाखवत फलंदाजीत २ शतके व ४ अर्धशतके झळकवत १० डावात ५४७ धावा केल्या तर गोलंदाजीत १० सामन्यातील १६ डावात ४९ बळी घेतले व अर्थातच अंतिम लढतीत नाबाद १५२ धावांची अविस्मरणीय खेळी केली.

ईश्वरी सावकार ची मागील हंगामात १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली होती . राष्ट्रीय पातळीवरील १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत ईश्वरीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघ उपान्त्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला. ईश्वरी सावकार ची चॅलेंजर ट्रॉफी साठी महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात देखील निवड झालेली होती . तसेच सुरत येथे झालेल्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय आयोजित, राज्यस्तरीय महिला ५० षटकांच्या स्पर्धेत महाराष्ट्र क्रिकेट संघातर्फे सलामीवीर म्हणुन खेळताना ईश्वरी सावकार ने फलंदाजीचे जोरदार प्रदर्शन केले होते . विविध स्पर्धांतील लक्षणीय कामगिरीच्या जोरावर ईश्वरीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे या अतिशय महत्वाच्या हाय परफॉरमन्स शिबिरासाठी म्हणजेच १९ वर्षांखालील वयोगटात संभाव्य निवडक गुणी खेळाडूंना २०२३ साली साऊथ आफ्रिकेत होणार्‍या पहिल्या विश्वचषकाच्या दृष्टीने तयारी निवड झाली होती. ईश्वरीला १९ वर्षांखालील बीसीसीआय स्पर्धेतील सातत्यपूर्ण फलंदाजीची ताबडतोब पावती मिळाली व १९ वर्षांखालील चॅलेंजर ट्रॉफी साठी इंडिया ए संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली. त्यापाठोपाठ श्रीलंका व वेस्ट इंडीज विरुद्धच्या चौरंगी मालिकेसाठी ईश्वरीची १९ वर्षांखालील इंडिया बी संघात निवड झाली . या चौरंगी मालिकेत सलामीला फलंदाजीला येत अंतिम फेरीतदेखील फलंदाजीतील सातत्य कायम ठेवत इंडिया ए विरुद्ध आपल्या इंडिया बी संघातर्फे सर्वाधिक ३६ धावसंख्या नोंदवली . त्यानंतर ईश्वरी सावकारच्या नेतृत्वाखाली खेळत बीसीसीआयच्या राष्ट्रीय पातळीवरील १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय स्पर्धेत महाराष्ट्राला उपान्त्य फेरी गाठण्यात मोठा वाटा उचलला. या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवरील महिला एकदिवसीय सामन्यांच्या डेहराडून येथे खेळल्या गेलेल्या स्पर्धेत घणाघाती दिडशतक झळकवत अफलातून फलंदाजीचे प्रदर्शन घडवले. नाशिकच्या महिला क्रिकेटपटूने प्रथमच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – आयोजित राष्ट्रीय पातळीवरील महिला स्पर्धेत कर्णधारपद भूषवत असे शतकच नव्हे तर दिडशतक झळकवत ऐतिहासिक कामगिरी केली. ईश्वरीची १९ वर्षांखालील भारतीय संघातील निवडीची संधी अगदी थोडक्यात हुकली .

साहिल पारख याची नुकतीच १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघात, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – २०२३ -२४ च्या विनू मंकड करंडक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १२ ते ३० ऑक्टोबर दरम्यान विजयवाडा येथे सदर स्पर्धा होत आहे. साहिल पारख डावखुरा सलामीवीर असून त्याची याआधी १६ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी निवड झाली होती. १७ एप्रिल ते ११ मे दरम्यान माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख , कुमार खेळाडूंसाठी हे शिबीर झाले होते. साहिलची १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघातही निवड झाली होती. सुरत येथे खेळल्या गेलेल्या बी सी सी आय विजय मर्चंट ट्रॉफीत महाराष्ट्र संघाच्या सिक्कीम संघावरील विजयात साहिलने केवळ १४९ चेंडूत ३५ चौकार व ४ षटकारांसह तूफान फटकेबाजी करत धमाकेदार नाबाद २२४ धावा केल्या व नंतर आसाम विरुद्ध हि अर्धशतक केले होते.

सत्यजित बच्छा , ईश्वरी सावकार व साहिल पारख या नाशिकच्या अतिशय गुणी तीन क्रिकेटपटूच्या बहुमानामुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात, तसेच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिघांचेही अभिनंदन करून यापुढील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
The best cricketer award of Maharashtra Cricket Association has been announced to these cricketers from Nashik

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ड्रग्ज तस्करी आणि ससून हॉस्पिटलचा कारभार… राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय

Next Post

राज्य सरकार नेमणार ३ हजार बाऊन्सर….खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत केली ही टीका

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

kapus
संमिश्र वार्ता

केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क माफीला दिली या तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 28, 2025
kanda onion
स्थानिक बातम्या

शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडणे हे केंद्र सरकारचे नियोजनबद्ध षडयंत्र…कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

ऑगस्ट 28, 2025
Untitled 1
संमिश्र वार्ता

मुंबईत अभिनेता सलमान खान यांच्या घरचा गणेशोत्सव…बघा, व्हिडिओ

ऑगस्ट 28, 2025
manoj jarange 1
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला येणार की परत माघारी जाणार? सरकारचे प्रयत्न सुरु

ऑगस्ट 28, 2025
GzWb8 LbwAAmwZi e1756344943344
महत्त्वाच्या बातम्या

बघा, शिवतीर्थावरील हा व्हिडिओ….राज ठाकरे उध्दव ठाकरे यांच्या सहकुटुंब भेटीचे चित्रीकरण

ऑगस्ट 28, 2025
modi 111
मुख्य बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवत्सरीनिमित्त दिल्या शुभेच्छा…क्षमा, करुणा आणि नम्रतेचे केले आवाहन

ऑगस्ट 28, 2025
प्रातिनिधिक फोटो
राष्ट्रीय

या चार नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता…१२ हजार ३२८ कोटींचा अंदाजित खर्च

ऑगस्ट 28, 2025
Screenshot 20250828 063447 Collage Maker GridArt
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील या चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर…शिक्षक दिनानिमित्त दिल्लीत समारंभ

ऑगस्ट 28, 2025
Next Post
Supriya Sule e1699015756247

राज्य सरकार नेमणार ३ हजार बाऊन्सर….खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत केली ही टीका

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011