इंडिया दर्पण वृत्तसेवा
मुंबई – ‘गणपती बाप्पा मोरयाचा जयघोषाचा निनाद, श्री गणेशांचे उत्सवाच्या निमित्ताने सजलेले रुप आणि आरती-मंत्रोच्चार अशा भारावलेल्या भक्तीपूर्ण वातावरणात विविध देशातील पाहुण्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी प्रतिष्ठापित श्री गणेशांचे मनोभावे दर्शन घेतले. मुंबईतील विविध देशांच्या वाणिज्य दूतावासांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर हे ते विदेशी पाहूणे होते. यात रशियाच्या सेंट पीटसबर्गचे उपप्रांतपाल व्लादिमीर क्याजिनीन यांच्यासह तब्बल ३० हून अधिक देशातील विदेशी पाहुण्यांचा समावेश होता.
अफगणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बहारीन बेलारूस, फिनलँड, हंगेरी, इस्त्रायल, जपान, कोरिया, मॉरीशस, पोलंड, सिंगापूर, स्पेन, टर्की, बांग्लादेश, ग्रेट-ब्रिटन, चीन, इराण, आर्यलंड, इटली, रशिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, थायलंड, संयुक्त अरब अमिरात, व्हिएतनाम, युगांडा, कोलंबिया, केनया, युक्रेन या देशांच्या वाणिज्य दूतावास प्रमुख, वरिष्ठ अधिकारी वर्षा शासकीय निवासस्थानी आवर्जून भेट दिली. श्री गणेश दर्शनानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे स्वागत केले. त्यांच्याशी दिलखुलास संवादही साधला. याच दरम्यान इर्शाळवाडीतील मुलांच्या हस्ते आरतीही करण्यात आली. या मुलांच्या अनुषंगाने माहिती घेतानाच, या विदेशी पाहुण्यांनीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संवेदनशीलतेलाही दाद दिली.
श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतानाच या सर्व विदेशी पाहुणे मंडळींनी श्री गणेश पूजाविधीची आवर्जून माहिती घेतली. यानिमित्ताने वर्षा करण्यात आलेले स्वागत आणि भक्तीपूर्ण, उत्साही वातावरण याबाबतही या विदेशी पाहुण्यांनी आनंद आणि समाधानाच्या उत्स्फूर्त प्रतिक्रीयाही व्यक्त केल्या.
Shri Ganesh darshan at Chief Minister’s ‘Varsha’ impressed foreign guests…!