इंडिया दर्पण वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत आले नाहीत का ? असा मिश्किल सवाल करत या पत्रकार परिषदेतला सुरुवात केली. काल खासदार संजय राऊत यांनी एक पत्रकार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न विचारला.
या बैठकीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहण्यासाठी संजय राऊत यांना पोलिसांनी पास दिला होता. त्यामुळे संजय राऊत पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार का असा प्रश्न होता. परंतु संजय राऊत मात्र या पत्रकार परिषदेत उपस्थित नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊत आले नाहीत का ? तुमचे ते विकास राऊत असे म्हणत राऊतांना टोला लगावला.
दरम्यान पोलिसांकडून देण्यात आलेल्या पासबद्दल विचारल्यावर संजय राऊत म्हणाले होते की, मी संपादक आहे. या महाराष्ट्रातला ज्येष्ठ संपादक आहे. माझी इच्छा झाली तर मी जाईन. पण मी गेलो तर गोंधळ निर्माण होईल आणि मला ते नकोय. यावेळी त्यांनी मी पत्रकार परिषदेत येईल याची मुख्यमंत्र्यांना धाकधूक होत होती. मुख्यमंत्र्यांनी १ रुपया सुद्धा मराठवाड्याला दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला.
संक्षिप्त मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे :
-मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार. ११ जलसंपदा प्रकल्पांना मान्यता. १३ हजार ६७७ कोटींचा सुधारित वाढीव खर्च मंजूर .
-अंबाजोगाई तालुक्यात लाल कंधारी, देवणी देशी गोवंशाचे जतन करणार
छत्रपती संभाजीनगरला फिरत्या भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेची स्थापना
ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०७६ कोटींची वाढीव तरतूद. मराठवाड्यातील १२ लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ.
हिंगोली येथे नवीन वैद्यकीय शासकीय महाविद्यालय. ४८५ कोटी खर्चास मान्यता
राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टर्सना ८५ हजार रुपये दरमहा मानधन. १२.८५ कोटी खर्च
सौर ऊर्जा कुंपणासाठी रक्कम थेट हस्तांतरित होणार
समग्र शिक्षामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० टक्के वाढ.
राज्यातील शाळा आता दत्तक घेता येणार गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निर्णय.
सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय
परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय
परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय
परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र. सोयाबीन उत्पादनास गती येणार
सोयगाव तालुक्यात शासन अनुदानित कृषी महाविद्यालय
नांदेड येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय
धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा
जालना येथे आयटीआय इन्क्युबेशन सेंटर स्थापणार. १० कोटीस मान्यता
गोर (बंजारा) समाज भवनासाठी नवी मुंबई येथे भूखंड देणार
राज्यात ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण’ अभियान राबविणार
२००५ पूर्वी नियमित पदावर अस्थायी सेवेतील कार्यरत आणि २००९ मध्ये
नियमित सेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मॅटच्या आदेशाचा लाभ
Didn’t Sanjay Raut come? Chief Minister Eknath Shinde