इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कानून के हाथ लंबे होते है ‘ असा हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग सर्वांनाच आठवतो, त्याचबरोबर एखादा गुन्हा घडला, तर पोलीस उशिरा पोहोचतात असे म्हटले जाते. पोलीस तपासा टाळाटाळ करतात मात्र काही वेळा हे खोटे देखील ठरते, कारण पोलीस काही वेळा एखाद्या गुन्हेगारा मागे किंवा गुन्ह्याचा शोध लावण्यात लागले तर त्याचा अनेक वर्षानंतरही तपास करून दाखवितात, अशीच घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे १ किंवा २ नव्हे तर सुमारे ३६ वर्षांच्या पूर्वी घडलेल्या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी अखेर आरोपीला ठोकल्याने या घटनेची आता चर्चा सुरू आहे.
खुनाचा बदला घेण्यावरून केला खुन
या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील उंब्रज पोलीस ठाण्यामध्ये नोव्हेंबर १९८७ मध्ये एक फिर्याद दाखल झाली होती, त्यावेळी त्या घटनेचा तपास पोलिसांना लागला नव्हते त्यामुळे कालौवघात ही घटना विस्मृतीत गेली. मात्र आता तब्बल तीन तपानंतर म्हणजेच सुमारे ३६ वर्षानंतर या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी लाला तेली (रा. मनव, ता. कराड) मोठया शिताफीने जेरबाद करण्यात पोलीसांना यश आले आहे.
मनव गावातील बाळू सरगर, दत्तू सरगर व अन्य साथीदारांनी यांनी गावातीलच भीमराव तेली सन १९८३ मध्ये खून केला होता. या खुनाच्या बदला घेण्याच्या कारणावरून लाला तेली, संपत तेली, महादेव तेली व दत्तू तेली (सर्व रा. मनव) यांनी पाल-खंडोबा येथील दत्तू यालमारे यांचा कोयता, कुऱ्हाड या सारख्या घातक हत्याराने निर्घुण खून केला होता. या गुन्ह्याची नोंद उंब्रज पोलिसात दाखल होता. आणि त्यातील आरोपी लाला तेली हा गुन्हा घडल्यापासून ३६ वर्षे फरार होता. तो नेमका कुठे फरार होता याचा तपास लागत नव्हता, जिल्हा बाहेर जिल्ह्यात किंवा राज्यात गेला असावा असा पोलिसांचा अंदाज होता.
गुप्त माहितीच्या आधारे ठोकल्या बेड्या
त्या काळात हे दोन खुन चांगलेच गाजले होते कुणाच्या बदल्यात खून झाल्याने दोन्ही गावांमध्ये द्वेषाची आणि संतापाची भावना होती, कालांतराने पिढी बदलल्याने अनेकजण ही घटना विसरून गेले होते, पोलीस दप्तरी मात्र याची नोंद होती आणि चर्चाही होत होती. अखेर खून करणारा आरोपी हा गणेशोत्सव काळात गावात येतो, अशी माहिती पोलिसांना कळाली होती त्यामुळे यंदा गणेशोत्सवात त्याला अटक करायचीच असा निर्धार पोलिसांनी केला होता. दरम्यान, गणेशोत्सवासाठी कराडमध्ये बंदोबस्तात असताना, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांना खबरीकडून लाला तेली हा मनव गावी आपल्या घरी येणार असल्याची गुप्त माहिनी दिली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या सूचनेवरून सहायक पोलीस निरीक्षक नितीन शेळके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून लाला तेली यास मध्यरात्री त्याच्या घरातून लाला यास शिताफीने जेरबंद केले.
Accused caught after 36 years…