चांदवड (इंडिया दर्पण वृत्तससेवा) – मुंबई -आग्रा महामार्गांवर चांदवड चौफुलीवर एसटी-कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कंडक्टरचा जागीच मृत्यू तर ४ कॉलेज विद्यार्थ्यासह काही प्रवासी जखमी झाले आहे. या जखमीना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात इतका भीषण आहे की एसटीचा मागचा भाग पूर्ण कापला गेला.
दहा दिवसापूर्वीच चांदवड जवळ कार -कंटेनरच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले होते. त्यात धुळ्यातील नगरसेवक किरण अहिरराव ,अनिल विष्णू पाटील, कृष्णाकांत चिंधा माळी आणि प्रवीण मधुकर पवार यांचा समावेश होता. नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई -आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात झाला होता.
सकाळी सात वाजता हा अपघात झाला होता. कारमधील हे सगळे नाशिककडून धुळे येथे चालले होते.या घटनेनंतर पोलिस व सोमा टोलवेज कंपनीचे अपघातग्रस्त पथक घटनास्थळी पोहचले. या अपघात इतका भीषण होता की कारचा चेंदामेंदा झाला आहे. आजही याच रस्त्यावर हा भीषण अपघात झाला.
Terrible accident of ST-container on Mumbai-Agra highways, one killed and 4 injured