इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) मंत्रालयाने X, युट्युब (Youtube) आणि टेलिग्राम (Teleram) या समाज माध्यम मध्यस्थांना नोटीस बजावली असून, त्यांनी भारतामधील आपल्या इंटरनेट व्यासपीठावरून बाल लैंगिक अत्याचार विषयक सामग्री (सीएसएएम) काढून टाकण्यासंबंधी इशारा दिला आहे.
या समाज माध्यमांनी आपल्या व्यासपीठावरील सीएसएएम संबंधित कोणत्याही सामुग्रीमधील प्रवेश तात्काळ आणि कायम स्वरूपी बंद करावा, असे या नोटीसांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भविष्यात सीएसएम चाप्रसार रोखण्यासाठी कंटेंट मॉडरेशन अल्गोरिदम आणि रिपोर्टिंग मेकॅनिझम यासारख्या सक्रिय उपायांच्या अंमलबजावणीवरही यात भर देण्यात आला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या या नोटिसांमध्ये म्हटले आहे की, या अटींचे पालन झाले नाही, तर ते आयटी नियम २०२१ च्या नियम ३(१)(b) आणि नियम ४(४) चे उल्लंघन मानले जाईल.
मंत्रालयाने या तीन समाज माध्यम मध्यस्थांना इशारा दिला आहे की, या नोटिसांचे पालन करण्यात कोणताही विलंब झाला, तर परिणामी आयटी कायद्याच्या कलम ७९ अंतर्गत त्यांना देण्यात आलेली सुरक्षित प्रक्षेपणाची सुविधा काढून घेण्यात येईल, जी सध्या त्यांना कायदेशीर दायित्वापासून संरक्षण देते. भारतीय इंटरनेटवरून अशी हानीकारक सामग्री काढून टाकण्याचा हा दृष्टिकोन मंत्रालयाचा धोरणात्मक दृष्टीकोन बनावा, अशी केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांची भूमिका आहे.
माहिती तंत्रज्ञान (IT) कायदा, २००० सीएसएम सह पोर्नोग्राफिक सामग्रीसाठी कायदेशीर चौकट प्रदान करतो. आयटी कायद्याच्या कलम 66E, 67, 67A आणि 67B अंतर्गत अश्लील अथवा पोर्नोग्राफिक सामग्रीच्या ऑनलाइन प्रसारणासाठी कठोर दंड आकारला जातो.
This is because of the notice issued by the central government to X, YouTube and Telegram