इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत, केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना महागाई भत्ता (DA) आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाईवरील सवलतीचा हप्ता (DR) वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे.
१ जुलै २०२३ पासून झालेल्या महागाईची भरपाई करण्यासाठी, सध्याच्या मूळ वेतनाच्या/निवृत्तीवेतनातच्या ४२ टक्क्यात आणखी ४ टक्के वाढ झाली आहे. ही वाढ सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारीत स्वीकृत सूत्रानुसार केलेली आहे.
महागाई भत्ता आणि महागाई सवलत या दोन्हींमुळे सरकारी तिजोरीवर एकत्रित १२,८५७ कोटी रुपये प्रतिवर्ष इतका भार वाढेल.याचा लाभ सुमारे ४८.६७ लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६७.९५ लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे.
The Union Cabinet gave this good news to the Central Government employees and pensioners