नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवड जवळ कार -कंटेनरच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई -आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात कार मधील चार ठार जण जागीच ठार झाले. यात धुळ्यातील नगरसेवक किरण अहिरराव , अनिल विष्णू पाटील, कृष्णाकांत चिंधा माळी आणि प्रवीण मधुकर पवार यांचा समावेश आहे.
या अपघातातील मयत हे नाशिककडून धुळे येथे चालले होते. अपघातातील मयत हे धुळे जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांची नावेही समोर आली. या घटनेनंतर पोलिस व सोमा टोलवेज कंपनीचे अपघातग्रस्त पथक घटनास्थळी पोहचले. येथे मदतकार्य करण्यात आले. या अपघातानंतर काही वेळ महामार्ग ठप्प झाला होता.
रविवारी अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा येथे पर्यटकांची कार १०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली होती. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर चारजण जखमी झाले होते. परतवाडा ते चिखलदरा मार्गावर मोथा गावाजवळ ही कार खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर चारजण गंभीर जखमी झाले. हे सर्व मृतक आणि जखमी आंध्रप्रदेशातील होते.
या अपघात झाल्यानंतर कारचा चेंदामेंदा झाला. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. तेलंगणातील आदिलाबाद येथून आठ पर्यटक चिखलदऱ्यात आले होते. अमरावती-चिखलदरा मार्गावरून जात असताना ही घटना घडली. काल चिखलदरात ही घटना घडली आज चांदवड जवळ कारचा अपघात झाला..
Fatal car-container accident near Chandwad: Four killed on the spot