इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा (बीएसई) प्रत्येक निर्णय मार्केटवर परिणाम करणारा ठरतो. बरेचदा यातून चांगलेच परिणाम होतात, पण काही निर्णय कमी कालावधीसाठी का होईना पण मार्केट डाऊन करतात. सध्या अशाच एका निर्णयामुळे शेअर्सच्या किंमती सध्याच्या किंमतीवरून अगदी कमी कालावधीसाठी अचानक घसरून पुन्हा जुन्या किंमतीवर आली आहे.
बीएसईने पारंपारिक किंवा अल्गोरिदमिक प्रणालींमधून उद्भवणाऱ्या ट्रेडचे चुकीचे वाटप रोखण्यासाठी ९ ऑक्टोबरपासून ‘स्टॉप लॉस मार्केट’ (SL-M) ऑर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘फ्रीक ट्रेड’च्या नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या घटनेमुळे महिन्याच्या सुरुवातीला स्टॉप लॉस मार्केट ऑर्डरवर व्यापारी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. या ऑर्डर अंतर्गत, जेव्हा किंमत निर्दिष्ट किंमतीपर्यंत पोहोचते तेव्हा शेअर्स आपोआप विकले किंवा खरेदी केले जातात. स्टॉप लॉस ही अशी पद्धत आहे जी गुंतवणूकदाराने त्याचे नुकसान मर्यादित करण्यासाठी वापरली आहे. अर्थात गुंतवणूकदाराने ब्रोकरला दिलेली ऑर्डर आहे की सिक्युरिटीज किंवा शेअर्स विशिष्ट पूर्वनिर्धारित किमतीवर पोहोचताच त्यांची विक्री करा. यामध्ये एक पर्याय म्हणजे पहिला स्टॉप लॉस ट्रेडरने दिलेल्या किमतीवर म्हणजेच लिमिट प्राईसवर ट्रिगर केला जातो. दुसरा पर्याय म्हणजे स्टॉप लॉस मार्केट आहे. ज्यामध्ये बाजार भावावरच स्टॉप लॉस ट्रिगर होतो.
काय म्हणाले बीएसई?
बीएसईने शुक्रवारी एका नोटीसमध्ये म्हटले आहे की, ‘स्टॉप लॉस’ ट्रेडसह इक्विटी विभागातील बाजार स्थिती, इक्विटी डेरिव्हेटिव्ह, चलन डेरिव्हेटिव्ह आणि कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज चुकीचे डील वाटप रोखण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून ९ ऑक्टोबरपासून बंद केले जातील.
Market down with this decision of BSE! Profit or loss for investors?