इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली: शिस्त, अनुशासन यासाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपमधील महिला कार्यकर्त्या भर रस्त्यात एकमेकांवर भिडल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ माजविली आहे.
राजकीय पक्षांच्या बैठका, सभांमध्ये पुरुष कार्यकर्त्यांमध्ये वाद, भांडण, हाणामारी हा प्रकार अनेकांनी पाहिला आहे. परंतु, महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर भांडण्याचा प्रकार सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारा आहे. यूपीच्या जालौनमध्ये भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. रस्त्याच्या मधोमध त्यांच्यात राडा झाला. महिलांनी एकमेकींचे केस खेचले आणि धक्काबुक्की केली. यावेळी रस्त्यावर लोकांची मोठी गर्दी झाली असा दावा समाजवादी पक्षाने एक व्हिडीओ शेअर करताना केला आहे. या महिला भाजपाच्या नारी शक्ती वंदन संमेलनात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या, असे सांगण्यात आले. पण नंतर काही मुद्द्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या प्रकरणी समाजवादी पक्षाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला, एकमेकींचे केस ओढण्याची स्पर्धा, जालौनमध्ये भाजपाच्या संमेलनात आलेल्या महिला कार्यकर्त्या एकमेकींना भिडल्या, पुढे हा वाद टोकाला गेला आणि मारामारी झाली. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आधी आपल्या नेत्यांना शिस्तबद्ध राहायला शिकवले पाहिजे असे समाजवादी पक्षाने म्हटले आहे.
व्हायरल झाला व्हिडिओ
जालौनच्या कालपीनगर येथील राम वाटिका गेस्ट हाऊसमध्ये भाजपाचा नारी शक्ती वंदन संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय राज्यमंत्री भानु प्रताप वर्मा आणि उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्री अर्चना पांडे यांच्यासह अनेक नेते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. मात्र काही महिला आपापसात भांडू लागल्या. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये महिलांचे दोन गट आपापसात भांडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Rada of women workers of BJP… they trampled each other, their clothes were also torn… Video storm viral