इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क
तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २१ विद्यमान खासदारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यापैकी १२ खासदार निवडून आले व ते आमदार झाले. त्यामुळे एका पदावर राहणे गरजेचे आहे. त्यामुळे निवडून आलेल्या १२ खासदारांपैकी १० खासदारांनी आज राजीनामे दिले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि पंतप्रधान यांच्या भेटीनंतर या खासदारांनी राजीनामे दिले आहे.
राजीनामा देणा-या खासदारांमध्ये मध्यप्रदेशच खासदार नरेंद्रसिंग तोमर, प्रल्हाद सिंग पटेल, राकेश सिंग, उदय प्रताप आणि रिती पाठक आहेत. तर छत्तीसगडमधील अरुण साओ आणि गोमती साई हे आहेत. राजस्थानमधील राज्यवर्धन सिंह राठोड, दिया कुमारी आणि किरोडी लाल मीना हे आहे.
विधानसभेचे सदस्यत्व हे खासदार ठेवणार असल्यामुळे आगामी लोकसभेत त्यांना संधी मिळणार नाही. भाजपने अनेक अडचणीच्या ठिकाणी या खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यात काही यशस्वी झाले तर काहींचा पराभव झाला. जे पराभूत झाले ते नऊ खासदार मात्र लोकसभेतच राहणार आहे.