इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हुंडा देणे आणि घेणे कायद्याने गुन्हा असला तरी अजुनही हा प्रकार बिनधास्त सुरू आहे. बिहारमध्ये हुंड्यामुळे असाच एक बळी गेल्याचे उदाहरण पुढे आले आहे. मुख्य म्हणजे सुनेच्या हत्येची बातमी पसरू नये म्हणून सासरच्यांनी घाईघाईत तिचा मृतदेह जाळण्याचा प्रसत्न केला. मात्र, माहेरची मंडळी स्मशानघाटावर पोहचली आणि चितेवरून अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह काढवा लागल्याचा प्रकार घडला आहे.
हुंडासारखी अतिशय निंदनीय प्रथा अजुनही सुरू आहे. या प्रकारामुळे अनेक विवाहित महिलांना जीव गमवावा लागत आहे. काहींना आजन्म छळ सहन करावा लागतो. मात्र, अजुनही अशा घटना थांबलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवी बिहारमधील घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, बिहारमधील मोतिहारमध्ये एका नवविवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्याच्या लालसेपोटी सासरच्यांनी मुलीची हत्या करून मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार सुरू केल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांच्या माहितीवरून ते स्मशानभूमीत पोहोचले आणि त्यांना पाहताच मुलीचे सासरचे लोक पळून गेले. कुटुंबीयांनी चितेतून अर्धवट जळालेला मृतदेह उचलला आणि हरसिद्धी अरेराजचा मुख्य रस्ता अडवला. सासरच्यांनी तिचे हातपाय बांधून गळा आवळून खून केल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृताच्या कुटुंबीयांना समजावून सांगितले, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. फुलपरी देवी (वय २०) असे मुलीचे नाव होते.
पाच लाख आणि बाइकसाठी छळ
गरीब आईने मोठ्या कष्टाने आपल्या मुलीचे शिक्षण करून तिचे लग्न लावून दिले. मात्र, या हव्यासाने तिचीही हत्या केली. मुलीची आई रामवती देवी यांनी सांगितले की, आपल्या मुलीचे लग्न ८ मार्च २०२३ रोजी टोला गावातील रहिवासी सुभाष शर्मा यांचा मुलगा नितेश कुमार याच्याशी केले होते. लग्नानंतर त्यांची मुलगी सासरच्या घरी गेल्यापासून पाच लाख रुपये आणि बाईकसाठी तिचा छळ सुरू झाला. लग्नानंतर सहा महिन्यांनी नवऱ्याने तिला मारहाण करून आई-वडिलांच्या घरी पाठवले. काही वेळाने जावई नितेशकुमार आला आणि मुलीला घेऊन गेला. काही दिवसांनी मुलीवर अत्याचार करून तिला घराबाहेर हाकलून दिले. आता माहिती मिळाली की मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जाळला जात आहे. आम्हाला पाहताच सासरचे लोक तेथून पळून गेले. तेथे आम्ही चितेतून तिचा अर्धवट जळालेला मृतदेह बाहेर काढला.
The partially burnt body of the married woman was removed from the pyre.