माणिकराव खुळे
१- काल गुरुवार (२३)पासून सुरु झालेल्या २३ ते २७ नोव्हेंबर दरम्यानच्या पाच दिवसीय पावसाळी वातावरणापैकी रविवार व सोमवार दि.२६-२७ नोव्हेंबरला नंदुरबार धुळे जळगांव नाशिक छ. सं. नगर जिल्ह्यात पावसाची तीव्रताअधिक असुन तेथे तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
२-बुधवार दि.२९ नोव्हेंबर पासून वातावरण निवळून त्यापुढील ३ आठवड्यापर्यंत दुपारच्या कमाल तापमानात घट जाणवून दिवसाचा ऊबदारपणा कमी होवून दिवसाही काहीसा गारवा जाणवू शकतो. तर शुक्रवार ८ डिसेंबर पासून किमान तापमानताही हळूहळू घसरण होवून थंडीला सुरवात होवु शकते असे वाटते
गारपिटीचा काळ नसतांनाही, सध्या गारपीटीची शक्यता का निर्माण झाली ?
-खरं तर गारपीटीचा काळ साधारण २६ जानेवारी ते १५ मार्च पर्यन्त जाणवतो. तरीदेखील खालील? प्रणाल्यामुळे वर स्पष्टीत ? पाच जिल्ह्यात २ दिवस तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता निर्माण झाली आहे.
(i) अरबी समुद्रात मालदीव ते उत्तर महाराष्ट्र पर्यन्त पश्चिम किनारपट्टी समांतर पृष्ठभागापासून दिड किमी. उंचीच्या जाडीचा हवेच्या कमी दाबाच्या ‘ आस ‘ निर्मिती मुळे –
(ii)वायव्य उत्तर भारतातुन थेट म. प्रदेश, गुजराथ मधून उत्तर महाराष्ट्रापर्यन्त तसेच तेथून दक्षिण कोकण किनारपट्टीसमोर अरबी समुद्रात ६ किमी. उंचीच्या वर निर्मित हवेच्या कमी दाबाच्या आसामुळे येऊ घातलेल्या पश्चिमी झंजावाताचा परिणामामुळे –
(iii) ता. नाडू, केरळ भू -भाग ओलांडून दिड ते दोन किमी. उंचीपर्यंतची ‘पुरवी ‘ वारा प्रणाली अरबी समुद्रात उतरून विकसित होवून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी समांतर उत्तरेकडे आगेकूच करून वरील पश्चिमी झंजावात प्रणालीत होणाऱ्या विलीनिकरणामुळे दोन(ii व iii ) प्रणल्याच्या संयोगातून गारपीटीची शक्यता वाढली आहे.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.)
IMD Pune.