बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या मराठवाडा हा वेगवेगळ्या कारणांनी गाजत आहे, काही दिवसापूर्वीच मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होऊन या मागास भागाचा विकास व्हावा, यासाठी राज्य सरकारने काही घोषणा केल्या. मात्र दुसरीकडे बीड सारख्या जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. बीड जिल्ह्यात जमिनीच्या वादातून सख्या भावाने आपल्या भावाचा तर दारु पिऊन त्रास देत असल्याने मुलाने वडिलांचा केला खून केल्याने खळबळ उडाली आहे.
जमिनीच्या वादातून घडली घटना
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडच्या तिप्पटवाडी येथे जमिनीच्या वादातून भावानेच आपल्या भावाची हत्या केल्याची धक्कदायक घटना उघड झाली आहे. बळीराम शेंडगे व बबन शेंडगे हे दोघे सख्खी भाऊ असून त्यांच्यामध्ये जमिनीतून वाद निर्माण झाला होता वरून वाद निर्माण झाला होता त्यातूनच हे भयानक प्रकरण घडले. बळीराम शेंडगे (वय ४०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृत बळीराम शेंडगे हे त्यांच्या वडिलांची जमीन भावांना वाटून मागत होते.मात्र त्यांचा भाऊ बबन शेंडगे या वाटणी करण्यास टाळाटाळ करत होता. याच वादातून काही दिवसांपूर्वी दोघां भावांमध्ये किरकोळ वाद सुरू असताना बबन शेंडगे याने भाऊ बळीराम शेंडगे यांच्या डोक्यात धारदार शास्त्राने वार केला. या हल्ल्यात बळीराम शेंडगे गंभीर झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात होते, मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
खून करून मृतदेह फेकला नदीत
आणखी भयानक म्हणजे हत्येची दुसरी घटना ही बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. तालुक्यातील दिंद्रुड येथे दारू पिऊन त्रास देत असल्याने मुलानेच वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. मयत मुंजा कटारे (वय ५२) यांना दारूचे व्यसन होते. अनेक वेळा सांगूनही ऐकत नसल्याने मुलगा अशोक कटारे याने संतापाने जन्मदात्या बापाचा खून करून त्यांच्या तोंडाला पिशवी बांधून मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून दिला. मात्र परभणी पोलिसांनी या खुनाचा तपास लावत ही घटना उघडकीस आणली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
The brother killed the brother and the son killed the father.