इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली: बँक ऑफ बडोदाने कर्मचारी कपात सुरू केली आहे. एकीकडे आयटी कंपन्यांमध्ये अस्थिरतेचे वातावरण दिसून येत असताना दुसरीकडे देशातील मोठ्या सार्वजनिक बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने साठपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.
बँक ऑफ बडोदाने कपात केलेल्यांमध्ये एजीएम स्तरावरील अधिकारी हे स्केल फाइव्ह अधिकारी असतात जे सहसा एरिया मॅनेजर, झोनल हेड आणि २५ पेक्षा अधिक ब्रान्च हेडची कमान सांभाळतात. ही बाब बँकेच्या बीओबी वर्ल्ड अॅपच्या ऑडिटशी संबंधित आहे. निलंबनाच्या पत्रात बँकेने गंभीर स्वरुपात अनियमितता झाल्याचे मान्य केले आहे. काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात ग्राहकांच्या खात्यातील नंबर फिड केले आणि नंतर बीओबी वर्ल्ड अॅपमध्ये रजिस्ट्रेशन-डिरजिस्ट्रेशन केलं आणि हे सर्व ग्राहकांच्या संमतीशिवाय घडल्याचे सांगण्यात येत आहे. बँकेने कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या काळात त्यांना फक्त एक तृतीयांश पगार मिळेल. जर बँकेला ते दोषी आढळले तर त्यांना दंडात्मक पोस्टिंग मिळू शकते किंवा त्याची नोकरीही जाऊ शकते. दोषी आढळले नाही तर बँक निलंबन कालावधीसाठी भरपाई वेतन देईल, अशी माहिती आहे.
काय आहे बँकेचे म्हणणे
काही कर्मचाऱ्यांनी जे काही केले ते प्रथमदर्शनी कमिशन आणि ओमिशनचे प्रकरण होते, ज्यासाठी विभागीय चौकशी करण्यात आली. विभागीय चौकशीअंती अनियमितता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करणे योग्य असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. निलंबित करण्यात आलेले बहुतांश कर्मचारी हे बडोदा या भागातील आहेत. बँक आता लखनौ, भोपाळ, राजस्थान आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही झोनमध्ये अशीच कारवाई करू शकते.
Big blow to Bank of Baroda… Simultaneous suspension of 60 employees including executives