इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जी गोष्ट घरात सुरक्षित राहू शकत नाही, ती बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित राहते. बँकेत लॉकर उघडण्यासाठी सुद्धा अतिरिक्त पैसे भरावे लागतात आणि ज्यांचे बँकेत लॉकर असते ते घरी सुरक्षित राहू शकतात. पण या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना उत्तर प्रदेशात घडली. या घटनेनंतर देशभरातील बँकांमध्ये असलेल्या लॉकरकडे संशयाच्या नजरेतून बघितले जात आहे.
उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथील ही घटना आहे. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आघाडीवर असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या बाबतीत ही घटना घडल्यामुळे लोकांचे टेंशन वाढले आहे. येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत एका महिलेने आयुष्यभराची कमाई सुरक्षित ठेवली होती. त्यासाठी तिने लॉकर घेतले होते. या लॉकरमध्ये तिचे १८ लाख रुपये आणि दागिणे होते. हे सारे मुलीच्या लग्नासाठी तिने जमवले होते. एक दिवस या महिलेला आपले पैसे आणि दागीणे बघण्याची इच्छा झाली. खरे तर सारेकाही सुरक्षित असल्याचा विश्वास तिला होता.
परंतु, तरीही अधेमध्ये एक नजर पैशांवर आणि दागिण्यांवर टाकायला पाहिजे, या भावनेतून ती बँकेत गेली. बँकेत गेल्यावर तेथील व्यवस्थापकाने तिला लॉकरची चावी दिली. महिला आत गेली आणि तिने लॉकर उघडून बघितले, तर तिच्यापुढे जे दृष्य होते ते अंगावर काटा उभा करणारे होते. या दागिण्यांना आणि १८ लाख रुपयांना वाळवीने खाऊन टाकले होते. हे बघून महिलेला धक्काच बसला. या घटनेची चर्चा देशभर वाऱ्यासारखी पसरली. विशेष म्हणजे बँक ऑफ बडोदाच्या बाबतीत घडल्यामुळे त्याची जास्तच चर्चा होत आहे.
तक्रार कुणाविरुद्ध ?
गरज लागेल तेव्हा आपले पैसे हमखासपणे आपल्या हातात येतील याची संबंधित महिलेला खात्री होती. त्यामुळे ती निश्चिंत होती. अशात बँकेत गेल्यानंतर तिच्यापुढे जे काही चित्र होते ते अत्यंत धक्कादायक होते. त्यामुळे तिने बँकेच्या व्यवस्थापकाकडे रितसर तक्रार नोंदवली खरी. पण या प्रकरणात कोण कुणावर कारवाई करणार, याबाबत कमालीती उत्सुकता लागलेली आहे.
Jewelery and money kept in bank locker for girl’s marriage