इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
गेल्या काही वर्षांमध्ये केवळ राज्यातच नव्हे तर देशात अनेक सहकारी आणि खासगी बँकांमधील घोटाळे उघड होत आहेत. महाराष्ट्रात धाराशिव सहकारी बँक, पेन अर्बन बँक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक, मलकापूर बँक यासारख्या अनेक बँकांमध्ये रुपयांचे गैरकारभार घोटाळे तथा अन्य गैरव्यवहार उघडकीस आले आहेत. त्यामुळे खातेदार आणि ग्राहकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. औरंगाबाद शहरातील अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्बंध घालण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यातच आता महाराष्ट्रातील नव्हे तर उत्तर प्रदेशातील एका बँकेचा घोटाळा उघडकीस आला आहे.
तीन आरोपींना केली अटक
बांदा जिल्ह्यातील कोऑपरेटिव्ह बँकेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. बांदा जिल्ह्यातील बिसंडा हद्दीतील ओरन गावत ओरन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये बँकेच्याच ६ कर्मचाऱ्यांनी सुमारे ५ वर्षांपूर्वी ५ कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. यानंतर एसआयबीचे पथक या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत होती. त्यानंतर चौकशी सुरू होऊन या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी एसआयबी पथकाकडे देण्यात आली होती. हे पथक या प्रकरणाचा सातत्याने तपास करत होते. एसआयबीचे पथक बांदा येथे पोहोचले व पोलिसांच्या मदतीने तीन आरोपींना अटक केली. तर तीन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
आरोपींना न्यायालयीन कोठडी
उत्तर प्रदेशात एखाद्या सहकारी बँकेत अशा प्रकारच्या प्रचंड मोठा घोटाळा होण्याची अलीकडच्या काळातली ही पहिलीच घटना आहे. या तपासादरम्यान सहा बँक कर्मचाऱ्यांनी मिळून एवढा मोठा प्रचंड घोटाळा केल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. पोलीस आणि एसआयबीचे पथक फरार झालेल्या अन्य तिघांचा शोध घेत आहेत.
या प्रकरणाची माहिती देताना बिसंडा पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणाले की, लखनौहून एसआयबीची टीम आली होती. त्यांच्या सोबत पोलीसही पाठवण्यात आले. तपासादरम्यान तिघांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. या बँक कर्मचाऱ्यांनी बँकेत मोठा घोटाळा केला असून न्यायालयाच्या आदेशानुसार या सर्वांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र आता या परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
The employees robbed the bank… such a scam happened…