नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बागलाण तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे हरणबारी धरण ओव्हफ्लो होऊन वाहत असल्याने मोसम नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे मोसम नदी काठावरील अंबासन येथील पुलाला भगदाड पडले आहे.
अंबासन ग्रामपंचायत प्रशासनाने दवंडी पिटवत रहदारीसाठी पुल बंद केला आहे. या पुलावरून कोणीही आपली वाहने व रहदारी करू नये असे आवाहन केले आहे. रस्ता बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांची मोठी अडचण झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला आहे. त्याचप्रमाणे धरणांच्या पाणी साठ्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. नाशिकच्या गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने रात्री ८ वाजता 6282 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नांदूरमधमेश्वर धरणातून १६१४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
Heavy rain in Baglan taluka, bridge damaged, bridge closed for vehicles and traffic