इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी अयोध्या येथे राम जन्मभूमी येथे खोदकाम सुरू असताना जमिनीसाठी अनेक प्राचीन मूर्ती आणि स्तंभ आढळल्याची माहिती सोशल मीडियावर देऊन फोटोही शेअर केला आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी फोटो शेअर करताना लिहिले की, श्री रामजन्मभूमी येथे उत्खननादरम्यान सापडलेल्या प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. त्यात अनेक पुतळे आणि खांबांचा समावेश आहे’.
शेअर केलेल्या फोटोमध्ये जे पाषाण आहेत त्यावर कोरलेल्या मंदिराचे अवशेष दिसतात. त्यात काही दगडी शिल्पेही पाहायला मिळतात. सध्या चित्रात दगडी कोरीव शिल्पे, खांब, दगड आणि देवी-देवतांच्या कलाकृतींचा समावेश आहे. याआधीही राम मंदिरासाठी केलेल्या उत्खननात अशी शिल्पे आणि मंदिराचे अवशेष सापडले होते.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने याअगोदर राम मंदिर परिसरामध्ये एक संग्रहालय बांधण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. ज्यामध्ये उत्खननादरम्यान सापडलेल्या मूर्ती आणि मंदिरांचे अवशेष भाविकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.
Ancient idols and pillars found during excavations in Ayodhya
https://x.com/ChampatRaiVHP/status/1701650999327314406?s=20