इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारताने काल ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव करुन मालिका खिशात घातल्यानंतर आज महिला टीमने सुध्दा एशियन गेम्समध्ये श्रीलंकेचा पराभव करुन सुवर्ण पदक पटकावले. भारतीय महिला संघाने श्रीलंकेला विजयासाठी ११७ धावांचे आव्हान दिले होते. पण, श्रीलंकेला २० ओव्हरमध्ये आठ विकेट गमावत ९७ धावाच करता आल्या. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. एशियन गेम्समध्ये भारतीय महिला संघाने मिळवले क्रिकेटमध्ये पहिले सुवर्णपदक आहे.
टीम इंडियाकडून तितास साधू हीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. राजेश्वरी गायकवाड हीने २ विकेट्स घेतल्या. तर दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर आणि देविका वैद्य या तिघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यानंतर हा संघ बॅटींगमध्ये ढेपाळतच गेला.
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाच्या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने निर्धारित २० षटकात सात विकेटच्या मोबदल्यात ११६ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी शानदार खेळी केली. दोघांनी ८० धावांची भागिदारी केली. स्मृती मंधाना हिने ४५ चेंडूमध्ये ४६ धावांची खेळी केली. यामध्ये चार चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. तर जेमिमाने ४० चेंडूत ४२ धावांचे योगदान दिले. यामध्ये पाच चौकारांचा समावेश आहे. या सामन्यात रिचा घोष ९, हरमनप्रीत कौर २ पूजा २ अमनज्योत कौर १ इतक्याच धावा केल्या.
या सामन्यात हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, देविका वैद्य, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकार, तीतस साधू आणि राजेश्वरी गायकवाड यांनी सुवर्णपद मिळवण्याची कामगिरी केली.
The Indian women’s team won its first gold medal in cricket at the Asian Games