इंडिया दर्पण वृत्तसेवा
आशिया चषक भारत विरुद्ध श्रीलंकेचा अंतिम सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी पिचची पाहणी केली. या सामन्यात भारताचा अक्षर पटेल तर श्रीलंकेचा महिक्ष तिक्ष्णा दुखापतीमुळे फायनलमधून बाहेर आहे. रोहित शर्माचा २५० वा एकदिवसीय सामना आहे.
कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना सुरु झाला आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असले तरी प्रेक्षकांची उत्सुकता शिंगेला पोहचली आहे. अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशकडून ६ धावांनी पराभव केला. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांची निराशा झाली असली तरी अंतिम सामन्यात टीम इंडिया विजय मिळवेल यासाठी प्रेक्षकांना आशा आहे.
भारताने हे चषक ७ वेळा जिंकले चषक
भारताने हे चषक ७ वेळा जिंकले आहे. त्यामुळे आठव्यावेळेस ते जिंकेल अशी सर्वांना खात्री आहे. आशिया चषक स्पर्धेत भारताने १९८४, १९८८, १९९०, १९९५, २०१०, २०१६, २०१८ मध्ये ट्रॉफी आपल्या नावावर केली होती. श्रीलंकेने सहावेळा आतापर्यंत आशिया कपची ट्रॉफी जिंकली आहे. पाकिस्तानने दोनवेळा जेतेपद जिंकलं आहे. आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना होण्याची ही आठवी वेळ आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमधील ७ अंतिम सामन्यांमध्ये भारतीय संघाने चार वेळा विजय मिळवला आहे, तर श्रीलंकेनं तीन वेळा विजय मिळवला आहे.
सामन्यात जिंकण्याची संधी
या स्पर्धेतील सुपर फोर फेरीत भारताने श्रीलंका आणि पाकिस्तान दोघांचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेने आधी बांगलादेशला पराभूत केले आणि नंतर पाकिस्तानवर अखेरच्या चेंडूवर मात करत फायनल मध्ये प्रवेश केला. त्यामुळे श्रीलंका टीमचेही मनोबल उंचावले आहे. तर भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला असला तरी याआधी झालेल्या बांगलादेश विरोधात ६ धावांना पराभव पत्करला. त्यामुळे भारतीय संघाला या पराभवाला विसरुन अंतिम सामन्यात जिंकण्याची संधी आहे.
पाऊस आला तर दोघांमध्ये चषक विभागून
रविवारी कोलंबोमध्ये ८० टक्के पावसाची शक्यता आहे. त्यात दुपारी १ ते ७ वाजेपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी पाऊस आला तर हा सामना सोमवारी होईल. सोमवारी पावसामुळे जर दोन्ही संघांचा प्रत्येकी २० षटकांचा खेळ झाला तर डकवर्थ लुईस नियमानुसार विजेता ठरवण्यात येईल. पण, या दोन्ही दिवस पाऊस आला तर हा सामना रद्द करुन आशिया चषक विभागून दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी २००२ अंतिम सामन्यात असाच पाऊस आला होता. त्यावेळेस भारत विरुद्ध श्रीलंकेत सामना होता. त्यावेळी दोघांमध्ये चषक विभागून देण्यात आला होता. त्यामुळे हे दोन्ही संघ विजेत होतील.
Asia Cup; India vs Sri Lanka final match