इंडिया दर्पण डेस्क
आशिया कप सुपर फेरीमधील भारत आणि बांगलादेशमध्ये आज अखेरचा सामन्यात बांगलादेशने २६५ धावसंख्येपर्यंत मजल मारली.
शाकीब अल हसन आणि तौहीद ह्रदय या फलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने २६५ ही धावसंख्या उभारली. निर्धारित ५० षटकात आठ विकेट गमवत हा स्कोर केला. शाकीब अल हसन याने ८० तर तौहीद ह्रदय याने ५४ धावा केल्या. या सामन्यात भारताकडून शार्दूल ठाकूर याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. भारतीय संघाला विजयासाठी २६६ धावांचे आव्हान आहे. या सामन्यात रविंद्र जडेजाने बांगलादेशची सातवी विकेट घेत २०० विकेट पूर्ण के्ल्या आहेत. कपिल देव यांच्यानंतर २००० पेक्षा जास्त धावा आणि २०० विकेट घेणारा जडेजा दुसरा खेळाडू ठरला आहे.
भारताने आज नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. त्यानंतर बांगलादेशने ही धावसंख्या केली.या सामन्यात बांगलादेशची सुरुवात खराब झाली. एकापाठोपाठ एक तंबूत गेले. अवघ्या ५९ धावांत बांगलादेश संघाने आघाडीचे चार फलंदाज गमावले. पण कर्णधार शाकीब याने मोठी खेळी केली. त्याला तौहीद ह्रदय याने चांगली साथ दिली. शाकीब अल हसन आणि तौहीद ह्रदय यांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागिदारी करत बांगलादेशचा डाव सावरला.
या सामन्यात गोलंदाजीत शार्दूल ठाकूर याने तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद शामी याने दोन तर पदार्पण करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णा याला एक विकेट मिळाली. अक्षर पटेल आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
Asia Cup; Bangladesh set a challenge of 264 runs in front of India