इंडिया दर्पण वृत्तसेवा
आशिया चषक भारत विरुद्ध श्रीलंकेचा अंतिम सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर रविवारी ३ वाजता होणार असला तरी या सामन्यावर पावसाचे सावट आहे. रविवारी कोलंबोमध्ये ८० टक्के पावसाची शक्यता आहे. त्यात दुपारी १ ते ७ वाजेपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी पाऊस आला तर हा सामना सोमवारी होईल.
सोमवारी पावसामुळे जर दोन्ही संघांचा प्रत्येकी २० षटकांचा खेळ झाला तर डकवर्थ लुईस नियमानुसार विजेता ठरवण्यात येईल. पण, या दोन्ही दिवस पाऊस आला तर हा सामना रद्द करुन आशिया चषक विभागून दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी २००२ अंतिम सामन्यात असाच पाऊस आला होता. त्यावेळेस भारत विरुद्ध श्रीलंकेत सामना होता. त्यावेळी दोघांमध्ये चषक विभागून देण्यात आला होता. त्यामुळे हे दोन्ही संघ विजेत होतील.
एकुणच पावसाने आशिया चषकाने चांगलाचा धुमाकुळ घातला आहे. पावसामुळे सामनाचे निर्णय बदलत आहे. भारताने बांगलादेशकडून पराभव पत्करल्यानंतर सुध्दा भारतीय संघ जोशात आहे. या सामन्यात चषक जिंकण्याच्या जिद्दीने ते उतरणार आहे. पण, पावसाने जर सामना रद्द केला तर सर्वांचाच हिरमोड होणार आहे.