इंडिया दर्पण वृत्तसेवा
आशिया कप २०२३ च्या अंतिम फेरीत श्रीलंकेच्या होम ग्राऊंडवर धुव्वा उडवल्यामुळे श्रीलंका प्रेक्षकांचा हिरमोड झाला असतांना
बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी श्रीलंकेला गोड भेट दिली. त्यांनी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफला ५०,००० अमेरिकन डॉलर (४२ लाख रुपये) जाहीर केले. याबरोबरच जय शाह यांनी प्रेमदासा स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफच्या कामाचेही कौतुकही केले. त्याच्या मेहनतीमुळेच आशिया चषकचा फायनल सामना विना अडथळा पार पडला असे त्यांनी म्हटले आहे.
खरं तर आशिया कपच्या सामन्यात पावसाने अनेक वेळा अडथळे आणले त्यामुळे अंतिम सामन्यावरही पावसाचे सावट होते. पण, या संपूर्ण सामन्याच्या वेळी कोलंबोच्या ग्राउंड स्टाफने मैदान तयार करण्याचे वारंवार केले. अंतिम सामना ४० मिनिटे उशीरा सुरु झाला. कारण नाणेफेकीनंतर पाऊस पडला. पण, मैदानावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने मैदान कमी वेळात तयार करण्यात आले. सिराज यानेही ग्राऊंड्समनची ही मेहनत जवळून पाहिली होती. त्याने सामनावीर पुरस्कार आणि रक्कम त्या राबणाऱ्या हाताला दिली. सिराजच्या या कृतीचे कौतुक होतेय.
जयेश शाह यांनी टिव्टरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, “क्रिकेटच्या गमनाम नायकांना खूप खूप सलाम ! “आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) आणि श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) यांना कोलंबो आणि कँडीमधील समर्पित क्युरेटर्स आणि ग्राउंड्समॅनसाठी US$50,000 चा योग्य पुरस्कार निधी जाहीर करताना अभिमान वाटत आहे.
Jai Shah gave a prize of 42 lakhs to the ground staff of the stadium in the Asia Cup.